Rahul Tripathi : राहुल त्रिपाठीचा पहिल्याच सामन्यात मोठा कारनामा, थेट द्रविड-तेंडुलकरच्या पंगतीत धडक
राहुल त्रिपाठीचं (Rahul Tripathi Debut) वयाच्या 31 व्या वर्षी टी 20 पदार्पण झालंय.
पुणे : श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SL 2nd T20I) टीम इंडियाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले. अनफीट असलेल्या अर्शदीप सिंहचं (Arshdeep Singh) कमबॅक झालंय. तर राहुल त्रिपाठीचं (Rahul Tripathi Debut) वयाच्या 31 व्या वर्षी टी 20 पदार्पण झालंय. पदार्पण करताच त्रिपाठीचं दिग्गजांच्या यादीत समावेश झालाय. त्रिपाठी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि राहुल द्रविडनंतर (Rahul Dravid) तिसराच खेळाडू ठरला आहे. त्रिपाठी टी 20 डेब्यू करणारा तिसरा वयस्कर खेळाडू ठरला आहे. तसेच 102 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. (rahul tripathi become 3rd oldest player who debut in t20i after sachin tendulkar and rahul dravid ind vs sl 2nd match at pune mca stadium)
त्रिपाठी श्रीलंका विरुद्ध सुरु असलेल्या टी 20 मालिकेतून डेब्यू करणारा तिसरा भारतीय ठरला आहे. याआधी मुंबईतील पहिल्या सामन्यात शिवम मावी आणि शुबमन गिल या दोघांनी डेब्यू केलं होतं.
Congratulations to Rahul Tripathi who is all set to make his T20I debut for #TeamIndia ???#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/VX1y83nOsD
— BCCI (@BCCI) January 5, 2023
तिसरा वयस्कर भारतीय
सचिनने 1 डिसेंबर 2006 रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध टी 20 डेब्यू केलं होतं. त्यानंतर राहुल द्रविडने इंग्लंड विरुद्ध 31 ऑगस्ट 2011 ला पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता त्रिपाठीने वयस्कर खेळाडू म्हणून तिसरा क्रमांक लावलाय.
दुसऱ्या टी 20 साठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शिवम मावी, अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि युजवेंद्र चहल.
श्रीलंका प्लेईंग इलेव्हन : दासुन शानका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, धनंजया डिसिल्वा, चरित असालंका, भानुका राजपक्षे, वानिंदु हसारंगा, चामिका करुणारत्ने, महीष तीक्षणा, कासुन रजिता आणि दिलशान मधुशंका.