IND vs NZ 3rd T20 : गोळीसारखा 149KMPH वेगात बॉल, Rahul Tripathi चा तितकाच कडक SIX, VIDEO
IND vs NZ 3rd T20 : राहुल त्रिपाठी अहमदाबादमध्ये तिसऱ्या टी 20 सामन्यात बॅटिंगसाठी मैदानात उतरला, तेव्हा त्याने पहिल्या दोन मॅचची कसर भरुन काढली. या मॅचचा विजेता सीरीज विनर ठरणार होता. त्यामुळे टीम इंडियाला कामगिरी उंचावावी लागणार होती.
IND vs NZ 3rd T20 : टीम इंडियाने न्यूझीलंड आधी श्रीलंकेविरुद्ध T20 सीरीज खेळली. या सीरीजच्या दुसऱ्या सामन्यात राहुल त्रिपाठीने वेगवान 35 धावा फटकावल्या. राहुलच्या या खेळीने त्याच्याबद्दल अपेक्षा निर्माण केल्या. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिल्यामुळे राहुल त्रिपाठीला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळाली. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या दोन टी 20 सामन्यात राहुल त्रिपाठी अपेक्षित कामगिरी करु शकला नाही. त्याने दोन्ही मॅचमध्ये संधी वाया घालवली. रांची आणि लखनौ दोन्ही विकेट बॅट्समनपेक्षा बॉलरला अनुकूल होत्या. त्यामुळे या दोन विकेट्सवर राहुलला त्याच्या भात्यातील फटके दाखवता आले नाहीत.
दोन मॅचची कसर भरुन काढली
राहुल त्रिपाठी अहमदाबादमध्ये तिसऱ्या टी 20 सामन्यात बॅटिंगसाठी मैदानात उतरला, तेव्हा त्याने पहिल्या दोन मॅचची कसर भरुन काढली. या मॅचचा विजेता सीरीज विनर ठरणार होता. त्यामुळे टीम इंडियाला कामगिरी उंचावावी लागणार होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये इशान किशन बाद झाल्यानंतर राहुल बॅटिंगसाठी मैदानात उतरला. खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी त्याने थोडावेळ घेतला. पहिल्या दोन टी 20 सामन्यांपेक्षा ही विकेट वेगळी असल्याच लक्षात येताच राहुल त्रिपाठीने आक्रमक पवित्रा घेतला.
महाराष्ट्राच्या ‘या’ फलंजाजाने क्षमता दाखवून दिली
शॉट मारण्यासाठी त्याने गॅप शोधून काढले. इश सोढी आणि मिचेल सँटनर विरोधात त्याने स्वीपच्या फटक्याचा वापर केला. त्याने न्यूझीलंडच्या कुठल्याही बॉलरला वरचढ ठरु दिलं नाही. महाराष्ट्राच्या या फलंजाजाने आपली क्षमता दाखवून दिली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या बॉलिंगवर त्याने त्याच्या इनिंगमधला एक सर्वोत्तम शॉट मारला.
Hang on to your seats, for a whirlwind Powerplay has just ended! Yeh toh sirf 6️⃣ overs the. Picture abhi baaki hai mere dost!
Will #TeamIndia dictate the rest of the innings? #BelieveInBlue and tune-in to the 3rd Mastercard #INDvNZ T20I, LIVE ? on Star Sports & Disney+Hotstar. pic.twitter.com/WPmfeh1nHP
— Star Sports (@StarSportsIndia) February 1, 2023
फाइन लेगला सिक्स
फर्ग्युसन 6 वी ओव्हर टाकत होता. राहुलने त्याच्या स्लोअर चेंडूवर पॉइंटवरुन चौकार मारला. त्यानंतर फर्ग्युसनने गोळीसारखा 149KMPH वेगात स्टम्पसच्या दिशेने चेंडू टाकला. राहुल त्रिपाठी तो बॉल खेळण्यासाठी क्रॉस गेला. स्कूप शॉट मारत त्याने फाइन लेगला सिक्स मारला. राहुल त्रिपाठीने 22 चेंडूत 44 धावा फटकावताना 4 फोर आणि 3 सिक्स मारले. टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध 234 धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडला हा टार्गेट पेलवलं नाही. त्यांची टीम फक्त 66 रन्समध्ये ऑलआऊट झाली. टीम इंडियाने 168 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.