ODI World Cup 2023 | IND vs PAK वर्ल्ड कपमधील सामन्यावर मनसेने जाहीर केली भूमिका
ODI World Cup 2023 | दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना कुठल्या युद्धापेक्षा कमी नसतो. दोन्ही बाजूंना विजयच हवा अशी भूमिका असते. खेळ म्हटल्यावर कुठली एक टीम हरते, त्याचे पडसाद त्या-त्या देशात उमटतात.
मुंबई : यंदाची वनडे वर्ल्ड कप स्पर्धा भारतात होणार आहे. 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होईल. वर्ल्ड कपचा पहिला आणि शेवटचा फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. वर्ल्ड कपच शेड्युल जाहीर झाल्याने सर्व क्रिकेट चाहते आनंदात आहेत. सर्वांना उत्सुक्ता आहे, ती भारत-पाकिस्तान सामन्याची. 15 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारत-पाकिस्तानचा क्रिकेट सामना हा खेळाचा भाग आहे. पण त्यात बरेच अर्थ, भावना दडलेल्या आहेत.
दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना कुठल्या युद्धापेक्षा कमी नसतो. दोन्ही बाजूंना विजयच हवा अशी भूमिका असते. खेळ म्हटल्यावर कुठली एक टीम हरते, त्याचे पडसाद त्या-त्या देशात उमटतात.
मनसेने काय भूमिका घेतली?
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना हा चाहत्यांसाठी खेळाचा भाग आहे. पण या सामन्याच्या निमित्ताने राजकीय पक्ष सुद्धा भूमिका ठरवत असतात. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला विरोध केला आहे. “जे लोक आपल्या सैनिकांवर हल्ला करतात, त्यांचे प्राण घेतात. हनी ट्रॅपमध्ये आपल्या अधिकाऱ्यांना अडकवतात. अशा देशाबरोबर आपण खेळायच का?” असा सवाल मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे.हे मा.बाळासाहेबांना कदापिही पटलं नसत आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावं हे तर पटूच शकत नाही यावर भा ज प आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे उ बा ठा यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 29, 2023
संदीप देशपांडे काय म्हणाले?
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याची भारताला जी झळ सोसावी लागली, तो मुद्दा संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. “भारतात झालेल्या सर्व दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तान आहे. आपण अशा देशाच स्वागत करायच का? हा देशाचा विषय आहे, राजकारणाचा नाही” असं संदीप देशपांडे म्हणाले.
आपण हे सहन करायच का?
“असे सामने जेव्हा भारतात होतात, तेव्हा पाकिस्तानी नागरिक आपला ध्वज घेऊन येतात. आपण हे सहन करायच का? संपूर्ण देशात या विषयावर चर्चा झाली पाहिजे” असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. “मी, जे काही बोललो, त्या माझ्या भावना आहेत, पक्षाची भूमिका राज ठाकरे जाहीर करतील” असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. संदीप देशपांडेंनी काय टि्वट केलय?
संदीप देशपांडे यांनी या संदर्भात एक टि्वट केलय. “भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे. हे मा.बाळासाहेबांना कदापिही पटलं नसत आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावं हे तर पटूच शकत नाही यावर भा ज प आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे उ बा ठा यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे” असं संदीप देशपांडे यांनी टि्वटमध्ये म्हटलय.