IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये एका प्लेयरची बल्ले, बल्ले, फक्त 10 रन्ससाठी मिळाले 1 कोटी रुपये

IPL 2023 : फ्रेंचायजीने इतकी मोठी रक्कम मोजून त्याला विकत घेतलं. पण त्याने केल्या फक्त 10 धावा. आयपीएलमध्ये खेळणारा हा दिग्गज फलंदाज होता. त्याला संधी द्यायची नव्हती, मग विकत का घेतलं? हा प्रश्न आहे.

IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये एका प्लेयरची बल्ले, बल्ले, फक्त 10 रन्ससाठी मिळाले 1 कोटी रुपये
IPL 2023 Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 7:58 AM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या सीजनमधील विजेती टीम कुठली? त्याचा निर्णय झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून मुंबई इंडियन्सशी बरोबरी केली आहे. आता दोन्ही टीम्सच्या नावावर पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. रोमांचक सामन्यात अखेरच्या दोन चेंडूंवर सामन्याचा फैसला झाला. चेन्नईकडून रवींद्र जाडेजाने मोहित शर्माच्या गोलंदाजीवर सिक्स आणि फोर मारुन टीमला विजेतेपद मिळवून दिलं.

आयपीएल टुर्नामेंट म्हणजे पैशांचा पाऊस. क्रिकेट विश्वातील ही सर्वात श्रीमंत लीग आहे. खेळाडूंवर इथे सर्वाधिक पैसा खर्च केला जातो. त्यांना विकत घेण्यापासून ते खेळाडूंना काय हवं, नको यावर बारीक लक्ष दिलं जातो.

त्याला जास्त संधी मिळायला पाहिजे होती

IPL 2023 च्या सीजनमध्ये असाही एक खेळाडू आहे, ज्याला फक्त 10 रन्स करण्यासाठी 1 कोटी रुपये मिळाले. आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा इंग्लंडचा दिग्गज प्लेयर ज्यो रुटला फ्रेंचायजीने 1 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. ज्यो रुटचा अनुभव आणि परफॉर्मन्स लक्षात घेता, त्याला जास्तीत जास्त राजस्थानची टीम संधी देईल अशी अपेक्षा होती. पण असं घडलं नाही.

मग इतकी मोठी रक्कम का मोजली?

त्याला आधी प्लेइंग-11मध्ये स्थान मिळालं नाही. जेव्हा संधी दिली, तेव्हा फलंदाजीला फार वाव मिळाला नाही. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात 3 सामन्यात ज्यो रुटचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला. या तीन सामन्यात त्याला फक्त एकदा बॅटिंगची संधी मिळाली. त्यावेळी त्याने 10 धावा केल्या. आता प्रश्न हा आहे की, ज्यो रुट सारख्या प्लेयरला प्लेइंग 11 मध्ये संधी द्यायची नव्हती, मग त्याला इतकी मोठी रक्कम मोजून विकत का घेतलं? फलंदाजीत परफॉर्मन्स काय?

ज्यो रुटच्या T20 करीयरबद्दल बोलायच झाल्यास त्याने 32 टी 20 सामन्यात 35.72 च्या सरासरीने 126.31 च्या स्ट्राइक रेटने 893 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 5 अर्धशतक झळकवली आहेत. T20 मध्ये त्याचा सर्वोत्तम स्कोर 90 धावा आहे. गोलंदाजी करताना त्याने 6 विकेट काढल्या आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.