RR vs KKR Live Score, IPL 2022: जबरदस्त,अटी-तटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 7 धावांनी विजय

| Updated on: Apr 19, 2022 | 12:26 AM

Rajasthan royals vs Kolkata Knight Riders Live Score in Marathi: दोन्ही संघ आजचा सामना जिंकून गुणतालिकेत आपली स्थिती बळकट करण्याचा प्रयत्न करतील.

RR vs KKR Live Score, IPL 2022: जबरदस्त,अटी-तटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 7 धावांनी विजय
राजस्थान रॉयल्स वि कोलकाता नाइट रायडर्स

RR vs KKR, IPL 2022: IPL 2022 मध्ये आज क्रिकेट रसिकांना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (RR vs KKR) एक जबरदस्त सामना पहायला मिळाला. या सामन्यात अनेक चढ-उतार पहायला मिळाले. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 217 अशी विशाल धावसंख्या उभारली. त्यामुळे राजस्थान हा सामना सहज जिंकेल, असा अनेकांचा कयास होता. पण श्रेयस अय्यरच्या केकेआरने तो चुकीचा ठरवला. एवढ्या मोठया धावसंख्येचा केकेआरने आक्रमक सुरुवातीने पाठलाग सुरु केला. सुनील नरेनची पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गेली. पण त्यानंतर श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आणि एरॉन फिंचने डाव सावरला. फिंचने जोरदार फटकेबाजी केली. त्याने 28 चेंडूत 58 धावा केल्या. यात 9 चौकार आणि दोन षटकार होते. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना त्याने करुण नायरकडे सोपा झेल दिला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 217 धावा केल्या होत्या. केकेआरचा डाव 210 धावांवर आटोपला.

अशी आहे कोलकाताची Playing – 11 वेंकटेश अय्यर, एरॉन फिंच, श्रेयस अय्यर (कॅप्टन), नितीश राणा, शेल्डन जॅक्सन (विकेटकिपर), आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती,

अशी आहे राजस्थान रॉयल्सची Playing – 11 जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कॅप्टन), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियाओन पराग, आर.अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मेकॉय,

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 18 Apr 2022 11:39 PM (IST)

    राजस्थान रॉयल्सचा 7 धावांनी विजय

    शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर राजस्थान रॉयल्सने केकेआरवर 7 धावांनी विजय मिळवला. ओबेड मेकॉयने उमेश यादवला क्लीन बोल्ड केलं. तिथेच केकेआरचा खेळ संपला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 217 धावा केल्या होत्या. केकेआरचा डाव 210 धावांवर आटोपला.

  • 18 Apr 2022 11:35 PM (IST)

    शेल्डन जॅक्सनची विकेट

    ओबेड मेकॉय शेवटची ओव्हर टाकतोय. शेल्डन जॅक्सनने पहिल्या चेंडूवर दोन धावा काढल्या. दुसऱ्या चेंडूवर त्याने प्रसिद्ध कृष्णाकडे झेल दिला. केकेआरच्या 9 बाद 209 धावा झाल्या आहेत.

  • 18 Apr 2022 11:31 PM (IST)

    KKR ला विजयासाठी 6 चेंडूत 11 धावांची आवश्यकता

    KKR च्या 19 ओव्हर्समध्ये आठ बाद 207 धावा झाल्या आहेत. विजयासाठी 6 चेंडूत 11 धावांची आवश्यकता.

  • 18 Apr 2022 11:22 PM (IST)

    युजवेंद्र चहलची Hattrick

    युजवेंद्र चहलने यंदाच्या सीजनमधली पहिली Hattrick घेतली आहे. 17 व्या षटकाच्या शेवटच्या तीन चेंडूंवर त्याने श्रेयस, मावी, कमिन्सला बाद केलं. त्याआधी वेंकटेश अय्यरचं सॅमसनकरवी स्टम्पिंग केलं. एकाच ओव्हरमध्ये त्याने चार विकेट घेतल्या.

  • 18 Apr 2022 11:17 PM (IST)

    RR ला मिळाली श्रेयसची मोठी विकेट

    मॅच रोमांचक वळणावर असताना RR ला श्रेयसची मोठी विकेट मिळाली. युजवेंद्र चहलने 17 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर हे यश मिळवून दिलं. श्रेयस अय्यर 85 धावांवर पायचीत झाला. त्याने सात चौकार आणि चार षटकार लगावले. चहलने पुढच्याच पाचव्या चेंडूवर शिवम मावीला रियान परागकरवी झेलबाद केलं. त्याला भोपळाही फोडता आला नाही.

  • 18 Apr 2022 11:10 PM (IST)

    वेंकटेश अय्यर OUT

    केकेआरच्या 16 षटकात चार बाद 178 धावा झाल्या आहेत. श्रेयस अय्यर 85 धावांवर खेळतोय. 17 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वेंकटेश अय्यर स्टम्पिंग झाला. युजवेंद्र चहलने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवलं.

  • 18 Apr 2022 10:54 PM (IST)

    आंद्रे रसेलला अश्विनने गुंडाळलं

    राजस्थानला मोक्याच्या क्षणी आंद्रे रसेलची महत्त्वाची विकेट मिळाली आहे. अश्विनने त्याला क्लीन बोल्ड केलं. रसेल शुन्यावर बाद झाला. 14 षटकात राजस्थानच्या चार बाद 152 धावा झाल्या आहेत.

  • 18 Apr 2022 10:52 PM (IST)

    kkr च्या तीन बाद 148 धावा

    राजस्थानने दिलेल्या 218 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआर सुद्धा जबरदस्त फलंदाजी करत आहे. 13 ओव्हर्समध्ये त्यांच्या तीन बाद 148 धावा झाल्या आहेत. श्रेयस अय्यर 63 धावांवर नाबाद आहे. नितीश राणा या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद झाला. त्याने 18 धावा केल्या. 42 चेंडूत विजयासाठी 70 धावांची आवश्यकता आहे. आंद्रे रसेल आता खेळपट्टीवर आहे.

  • 18 Apr 2022 10:31 PM (IST)

    अखेर राजस्थानला फिंचची मोठी विकेट मिळाली

    राजस्थानप्रमाणे केकेआरचे फलंदाज सुद्धा जबरदस्त बॅटिंग करत आहेत. एरॉन फिंचने 25 चेंडूत अर्धशतक झळकावलं. फिंचने नऊ चौकार आणि दोन षटकार लगावले. पण प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना तो 58 रन्सवर आऊट झाला. 9 ओव्हर्समध्ये दोन बाद 107 धावा झाल्या आहेत. श्रेयस अय्यरही 41 खेळपट्टीवर आहे.

  • 18 Apr 2022 10:09 PM (IST)

    पावरप्लेमध्ये KKR ची जोरदार सुरुवात

    पावरप्लेच्या सहा षटकात केकेआरच्या एकबाद 57 धावा झाल्या आहेत. श्रेयस अय्यर-फिंचची फटकेबाजी सुरु आहे. श्रेयस 33, फिंच 23 धावांवर खेळतोय. अश्विनच्या शेवटच्या चेंडूवर फिंचने षटकार ठोकला.

  • 18 Apr 2022 09:53 PM (IST)

    एरॉन फिंच-श्रेयस अय्यरची जोडी मैदानात

    पहिल्याच ओव्हरमध्ये सलामीला आलेला सुनील नरेन शुन्यावर धावबाद झाला. एरॉन फिंच, श्रेयस अय्यरची जोडी मैदानात आहे. 2.4 षटकात केकेआरच्या 27 धावा झाल्या आहेत.

  • 18 Apr 2022 09:32 PM (IST)

    राजस्थानची विशाल धावसंख्या

    जोस बटलरची 103 धावांची शतकी खेळी. त्यानंतर अखेरीस शिमरॉन हेटमायरने 26 केलेल्या फटकेबाजीच्या बळावर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 217 धावा केल्या आहेत.

  • 18 Apr 2022 09:08 PM (IST)

    शतकी खेळीनंतर बटलर OUT

    शतक झळकावल्यानंतर जोस बटलर 103 धावांवर आऊट झाला. कमिन्सच्या गोलंदाजीवर वरुणने त्याचा झेल पकडला. 17 षटकात राजस्थानच्या तीन बाद 189 धावा झाल्या आहेत.

  • 18 Apr 2022 09:03 PM (IST)

    Six मारुन जोस बटलरने IPL मध्ये झळकवलं दुसर शतक

    पॅट कमिन्सनच्या चेंडूवर षटकार ठोकून जोस बटलरने IPL मध्ये दुसर शतक झळकवलं. 60 चेंडूत शतकी खेळी करताना त्याने नऊ चौकार आणि पाच षटकार लगावले.

  • 18 Apr 2022 08:55 PM (IST)

    राजस्थानची दुसरी विकेट, संजू सॅमसन OUT

    दमदार फलंदाजी करणारा संजू सॅमसन 38 धावांवर आऊट झाला. रसेलच्या गोलंदाजीवर शिवम मावीकडे झेल दिला. 15.2 षटकात राजस्थानच्या दोन बाद 164 धावा झाल्या आहेत.

  • 18 Apr 2022 08:45 PM (IST)

    कोलकाताच्या गोलंदाजांचा संघर्ष

    14 षटकात राजस्थानच्या 148 धावा झाल्या आहेत. बटलर 88 आणि सॅमसन 25 धावांवर खेळतोय.

  • 18 Apr 2022 08:39 PM (IST)

    जोस बटलरची जबरदस्त फलंदाजी

    जोस बटलर जबरदस्त फलंदाजी करतोय. 13 षटकात राजस्थानच्या एकबाद 133 धावा झाल्या आहेत. बटलर 85 आणि सॅमसन 14 धावांवर आहेत.

  • 18 Apr 2022 08:31 PM (IST)

    राजस्थान 100 धावांच्या पुढे

    शिवम मावीने 11 व षटक टाकलं. राजस्थान रॉयल्सच्या एक बाद 112 धावा झाल्या आहेत. संजू सॅमसनने दोन चौकार लगावले.

  • 18 Apr 2022 08:26 PM (IST)

    राजस्थानची दमदार फलंदाजी

    राजस्थान रॉयल्सच्या 10 षटकात एक बाद 99 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 68 आणि संजू सॅमसन एक रन्सवर खेळतोय.

  • 18 Apr 2022 08:25 PM (IST)

    अखेर केकेआरला मिळाली पहिली विकेट

    अखेर केकेआरला पहिली विकेट मिळाली. देवदत्त पडिक्ललला सुनील नरेनने बोल्ड केलं. पडिक्कलने 18 चेंडूत 24 धावा केल्या.

  • 18 Apr 2022 08:12 PM (IST)

    बटलरची शानदार हाफ सेंच्युरी

    सात षटकात राजस्थान रॉयल्सच्या बिनबाद 74 धावा झाल्या आहेत. बटलरने शानदार हाफ सेंच्युरी झळकवली. बटलरच्या 30 चेंडूत 51 धावा झाल्या आहेत. यात पाच चौकार आणि तीन षटकार आहेत. पडिक्कल 17 धावांवर खेळतोय.

  • 18 Apr 2022 08:05 PM (IST)

    पावरप्लेमध्ये राजस्थान रॉयल्सची जबरदस्त सुरुवात

    पावरप्लेमध्ये राजस्थान रॉयल्सने जबरदस्त सुरुवात केली. पहिल्या सहा षटकात राजस्थानच्या बिनबाद 60 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 46 आणि देवदत्त पडिक्कल 8 धावांवर खेळतोय.

  • 18 Apr 2022 07:54 PM (IST)

    जोस बटलरची जबरदस्त फलंदाजी

    वरुण चक्रवर्तीने चौथ षटक टाकलं. राजस्थानच्या बिनबाद 40 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 30 आणि देवदत्त पडिक्कल 6 धावांवर खेळतोय. बटलरने दोन चौकार, दोन षटकार लगावले आहेत.

  • 18 Apr 2022 07:51 PM (IST)

    जोस बटलरने लगावला SIX

    वरुण चक्रवर्तीच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जोस बटलरने स्ट्रेट सिक्स मारला.

  • 18 Apr 2022 07:48 PM (IST)

    जोस बटलरचा उमेशच्या गोलंदाजीवर हल्लाबोल

    तिसरं षटक उमेश यादवने टाकलं. या ओव्हरमध्ये जोस बटलरने एक चौकार आणि एक षटकार लगावला. राजस्थानच्या बिनबाद 24 धावा झाल्या आहेत.

  • 18 Apr 2022 07:40 PM (IST)

    बटलर-पडिक्कलची जोडी मैदानात

    शिवम मावीने दुसरी ओव्हर टाकली. राजस्थानच्या बिनबाद 9 धावा झाल्या आहेत. या ओव्हरमध्ये एक चौकार लगावला.

  • 18 Apr 2022 07:36 PM (IST)

    राजस्थानच्या डावाला सुरुवात

    उमेश यादवने पहिली ओव्हर टाकली. जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल ही राजस्थान रॉयल्सची सलामीची जोडी मैदानात आहे. बिनबाद दोन धावा झाल्या आहेत.

  • 18 Apr 2022 07:22 PM (IST)

    अशी आहे राजस्थान रॉयल्सची Playing – 11

    जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कॅप्टन), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियाओन पराग, आर.अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मेकॉय,

  • 18 Apr 2022 07:19 PM (IST)

    अशी आहे कोलकाताची Playing – 11

    वेंकटेश अय्यर, एरॉन फिंच, श्रेयस अय्यर (कॅप्टन), नितीश राणा, शेल्डन जॅक्सन (विकेटकिपर), आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती,

Published On - Apr 18,2022 7:17 PM

Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.