RR vs RCB IPL 2022 Qualifier 2 Live Score: राजस्थान फायनलमध्ये , जोस बटलरची शानदार सेंच्युरी
RR vs RCB IPL 2022 paly off match live: रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने एलिमिनेटरच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवला होता. तेच राजस्थान रॉयल्सला पहिल्या क्वालिफायरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगचा (IPL Qualifier 2) क्वालिफायर 2 चा सामना खूपच एकतर्फी झाला. राजस्थान रॉयल्सने RCB ने दिलेलं 158 धावांच लक्ष्य आरामात पार केलं. आधी राजस्थानच्या गोलंदाजांनी आपलं काम चोख बजावलं. त्यानंतर नेहमीप्रमाणे जोस बटलरने (Jos Buttler) विजयी नायकाची आपली भूमिका पार पाडली. जोस बटलरने शानदार शतक झळकावलं. राजस्थानने सात विकेट राखून RCB वर विजय मिळवला. जोस बटलरने 60 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. यात 10 चौकार आणि 6 षटकार होते. बटलरने षटकार ठोकून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. जोस बटलरचं या सीजनमधलं हे चौथ शतक आहे. त्याच्या खात्यावर चार अर्धशतकही जमा आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत बटलर पहिल्या स्थानावर असून त्याच्या 818 धावा झाल्या आहेत.
Key Events
राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसनने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान आणि बँगलोर दोन्ही टीम्सनी आपला मागच्या मॅचमधला संघ कायम ठेवला आहे.
LIVE Cricket Score & Updates
-
राजस्थान रॉयल्सचा संघ फायनलमध्ये
राजस्थान रॉयल्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यांनी RCB वर 7 विकेट राखून विजय मिळवला.
-
जोस बटलरची शानदार सेंच्युरी
जोस बटलरने शानदार सेंच्युरी झळकावली. त्याने 59 चेंडूत शतक झळकावलं. आयपीएलमधलं त्याचं हे चौथ शतक आहे.
-
-
राजस्थान विजयाच्या दिशेने
देवदत्त पडिक्कल 9 धावांवर OUT झाला. पण राजस्थान विजयाच्या मार्गावर आहे. राजस्थानला जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता जोस बटलर शतकाच्या जवळ आहे.
-
राजस्थानला विजयासाठी 42 चेंडूत 41 धावांची आवश्यकता
13 ओव्हर्समध्ये राजस्थानच्या दोन बाद 117 धावा झाल्या आहेत. राजस्थानला विजयासाठी 42 चेंडूत 41 धावांची आवश्यकता आहे. बटलर 70 आणि देवदत्त पडिक्कल 3 धावांवर खेळतोय. कॅप्टन संजू सॅमसन 23 धावांवर आऊट झाला.
-
राजस्थानची फटकेबाजी
राजस्थानच्या 11 षटकात एकबाद 112 धावा झाल्या आहेत. बटलर 68 आणि सॅमसन 23 धावांवर खेळतोय. राजस्थानला विजयासाठी 46 धावांची आवश्यकता आहे.
-
-
जोस बटलरची हाफ सेंच्युरी
8 ओव्हर्समध्ये राजस्थानच्या एक बाद 81 धावा झाल्या आहेत. बटलर 56 तर सॅमसन 4 धावांवर खेळतोय.
-
राजस्थानला पहिला झटका, यशस्वी जैस्वाल OUT
राजस्थानला पहिला झटका बसला आहे. यशस्वी जैस्वाल 21 धावांवर OUT झाला. हेझलवूडने कोहलीकरवी झेलबाद केलं.
-
राजस्थानची जबरदस्त सुरुवात, बँगलोरच्या गोलंदाजांची धुलाई
राजस्थान रॉयल्सने जबरदस्त सुरुवात केली आहे. बँगलोरच्या गोलंदाजांची धुलाई सुरु आहे. पाच ओव्हर्समध्ये राजस्थानच्या बिनबाद 61 धावा झाल्या आहेत. यशस्वी जैस्वाल 21 आणि जोस बटलर 40 धावांवर खेळतोय.
-
राजस्थानच्या बिनाबाद 37 धावा
तीन ओव्हर्समध्ये राजस्थानच्या बिनाबाद 37 धावा झाल्या आहेत. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलरची जोडी मैदानात आहे.
-
राजस्थानला कराव्या लागणार 158 धावा
राजस्थान रॉयल्सने आज चांगली गोलंदाजी केली. त्यांनी RCB ला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 158 धावांवर रोखलं. आरसीबीकडून रजत पाटीदारने सर्वाधिक 58 धावा केल्या. दिनेश कार्तिक आज अपयशी ठरला. त्याने फक्त 6 धावा केल्या. प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेड मेकॉयने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.
-
रजत पाटीदार OUT
हाफ सेंच्युरी झळकावल्यानंतर रजत पाटीदार OUT झाला आहे. त्याने 42 चेंडूत 58 धावा फटकावल्या. यात चार चौकार आणि तीन षटकार आहेत. अश्विनच्या गोलंदाजीवर बटलरने सीमारेषेवर त्याचा झेल घेतला.
-
ग्लेन मॅक्सवेल OUT, रजत पाटीदारची हाफ सेंच्युरी
ग्लेन मॅक्सवेल 24 धावांवर आऊट झाला. बोल्टच्या गोलंदाजीवर मॅकॉयने जबरदस्त झेल घेतला. 15 षटकात आरसीबीच्या 3 बाद 123 धावा झाल्या आहेत. रजत पाटीदारने हाफ सेंच्युरी पूर्ण केली आहे.
-
आरसीबीला दुसरा झटका, कॅप्टम फाफ डू प्लेसिस OUT
आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसिस 25 धावांवर आऊट झाला. मेकॉयच्या गोलंदाजीवर त्याने अश्विनकडे झेल दिला. 11 षटकात आरसीबीच्या दोन बाद 81 धावा झाल्या आहे.
-
नवनीत राणा अटक प्रकरण
संसदीय समितीने राणांच्या तक्रारीची घेतली दखल
15 जूनला राज्यातील अधिकारी यांना दिल्लीत हजर राहण्याचा आदेश
महाराष्ट्र DGP रजनीश सेठ, पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिल्लीत हजर राहण्याचे आदेश
भायखळा कारागृहाचे अधीक्षक यशवंत भानुदास यांनाही दिल्लीला येण्याचा आदेश
राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना 15 जूनला हजर राहावे लागणार
15 जूनला दुपारी साडेबारा वाजता संसदीय समिती समोर होणार सुनावणी
-
खरीप हंगामापूर्वीच अमरावती जिल्ह्यात बोगस बियाण्याचा सुळसुळाट
कृषी विभागाने जप्त केल्या बोगस सोयाबीनच्या बियाण्याच्या तबल 857 बॅग…
एकूण 36 लाख 73 हजारांचे बोगस सोयाबीन जप्त…
गुजरात आणि अमरावतीच्या मोझरी मधील सिड्स कंपनी भातकुली मधील प्लॅन्टवर भरत होते अनधिकृत सोयाबीन बियाने..
कृषी विभागाची सर्वात मोठी कारवाई.. पोलिसांत गुन्हा दाखल.
-
लडाखमध्ये सैन्यदलाच्या बसला अपघात
अपघातात 7 जवान मृत्युमुखी
कोल्हापूर जिल्ह्यातील जवान अपघातात शहीद
तूरतूक सेक्टर मध्ये बस नदी पात्रात कोसळली
26 जवान बस मध्ये होते
परतापुर ट्रान्झिट कॅम्प कडून येताना दुर्घटना
शहीद जवानांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जवानाचा समावेश
गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे गावचा प्रशांत जाधव हा जवान शहीद
प्रशांत जाधव यांचे पार्थिव उद्या बेळगावमध्ये आणले जाणार
-
रियान परागने पाटीदारचा सोपा झेल सोडला
पहिल्या सहा षटकात म्हणजे पावरप्लेमध्ये RCB च्या एक बाद 46 धावा झाल्या आहेत. फाफ डू प्लेसिस 17 आणि रजत पाटीदार 16 धावांवर खेळतोय. प्रसिद्ध कृष्णाने सहावी ओव्हर टाकली. या षटकात पाटीदारने कव्हर्समध्ये दोन सुंदर चौकार मारले, तर रियान परागने पाटीदारचा सोपा झेल सोडला.
-
चार षटकांचा खेळ पूर्ण
चार ओव्हर्समध्ये आरसीबीच्या एक बाद 25 धावा झाल्या आहेत. रजत पाटीदार आणि कॅप्टन फाफ डू प्लेसिसची जोडी मैदानात आहे. प्रसिद्ध कृष्णाने चौथं षटक टाकलं. .या ओव्हरमध्ये दोन चौकार मारले.
-
रजत पाटीदार मैदानात
तीन षटकात आरसीबीच्या एक बाद 17 धावा झाल्या आहेत. रजत पाटीदार आणि कॅप्टन फाफ डू प्लेसिसची जोडी मैदानात आहे. ट्रेट बोल्टने तिसर षटक टाकलं. या ओव्हरमध्ये एक चौकार मारला.
-
विराट कोहली OUT
दुसऱ्याच ओव्हरमध्ये विराट कोहली OUT झाला. प्रसिद्ध कृष्णाने विराटला यष्टीपाठी संजू सॅमसनकरवी झेलबाद केलं. विराटने 7 धावा केल्या. दोन षटकात आरसीबीच्या 1 बाद 13 धावा झाल्या आहेत.
-
आरसीबीच्या बिनबाद 8 धावा
ट्रेंट बोल्टने पहिलं षटक टाकलं, RCB ने पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 8 धावा केल्या. विराट कोहलीने बोल्टच्या शेवटच्या चेंडूवर मिडविकेटला सिक्स मारला.
-
RCB प्लेइंग -11
फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरॉड, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड
-
राजस्थान रॉयल्स प्लेइंग -11
संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मेकॉय,
-
संजू सॅमसनने टॉस जिंकला
राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसनने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Published On - May 27,2022 7:14 PM