IND vs ENG | पुजारा-रहाणेला पुन्हा कलटी, विराटच्या जागी 1 वनडे खेळलेल्याला संधी

India vs England Test Series | विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंड विरुद्ध पहिल्या 2 सामन्यांसाठी उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे विराटच्या जागी इंग्लंड विरुद्ध कोण खेळणार?

IND vs ENG | पुजारा-रहाणेला पुन्हा कलटी, विराटच्या जागी 1 वनडे खेळलेल्याला संधी
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 3:19 PM

हैदराबाद | टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांमधून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली. त्यामुळे विराटच्या जागी कुणाला संधी मिळणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला होता. अखेर क्रिकेट चाहत्यांच्या चर्चेला ब्रेक लागला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने विराटच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली आहे. तो खेळाडू कोण आहे, ते आपण जाणून घेऊयात.

बीसीसीआयने अद्याप विराटच्या जागी कुणाला संधी देण्यात आली आहे, याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र विराटऐवजी टीममध्ये मध्यप्रदेश इंदूरमधील रजत पाटीदार या युवा आणि फक्त 1 वनडे मॅच खेळलेल्याला संधी देण्यात आली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये विराट सारख्या दिग्गज खेळाडूच्या जागी तोडीसतोड खेळाडूला संधी मिळेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी रणजी ट्रॉफी स्पर्धेत सौराष्ट्रकडून विदर्भ विरुद्ध शतकी खेळी केलेल्या चेतेश्वर पुजारा याला संधी मिळेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती.

मात्र बीसीसीआयने ना चेतेश्वर पुजारा याच्या नावाचा विचार केला, ना अजिंक्य रहाणे याला संधी दिली. बीसीसीआयने थेट कसोटीसाठी फक्त 1 सामन्याच्या अनुभव असलेल्या पाटीदारचा थेट समावेश केलाय. आता रजतला इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटीत प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी मिळते की नाही, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

हे सुद्धा वाचा

तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडने सलामीच्या कसोटीआधी प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली आहे. या 11 खेळाडूंमध्ये अनुभवी जेम्स एंडरसन याला संधी देण्यात आलेली नाही. तर टॉम हार्टली याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.

चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.