IPL 2021: भारताचा ख्रिस गेल, ज्याला आज्जीनं कपडे धुवायच्या धोपटण्यानं क्रिकेटर बनवलं, गाजवतोय आयपीएल

राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) पंजाब किंग्सला (Punjab Kings) नमवताना कार्तिक त्यागी सामन्याचा हिरो ठरला. पण राजस्थानच्या फलंदाजीवेळी 17 चेंडूत 43 धावांची तुफान खेळी करणाऱ्या महिपालच्याही नावाची चर्चा सुरु झाली आहे.

IPL 2021: भारताचा ख्रिस गेल, ज्याला आज्जीनं कपडे धुवायच्या धोपटण्यानं क्रिकेटर बनवलं, गाजवतोय आयपीएल
महिपाल लोमरोर
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 7:23 PM

मुंबई: आयपीएलमध्ये (IPL 2021) मंगळवारी (21 सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यातील सामन्यात राजस्थानने अवघ्या 2 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो युवा गोलंदाज कार्तिक त्यागी (Kartik Tyagi). सर्वत्र त्याच्याच नावाची चर्चा आहे. पण त्यागी सोबतच अजून एका युवा खेळाडूने काल फलंदाजीत चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे या खेळाडूला त्याच्या धुंवादार खेळीमुळे भारतीय ख्रिस गेल असं म्हटलं जातं. या खेळाडूचं नाव आहे महिपाल लोमरोर (Mahipal Lomror).

राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणारा महिपाल लोमरोर हा 21 वर्षीय अष्टपैलू खेळाडू आहे. तो त्याच्या उत्तुंग अशा षटकारांसाठी ओळखला जातो. पंजाब विरुद्धच्या सामन्यातही त्याने 4 षटकारांच्या मदतीने 17 चेंडूत 43 धावा कुटल्या. त्याच्या या तुफानी खेळीनंतर त्याचं नाव चर्चेत आलं आहे. या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सने त्यांच्या ट्विटरवर महिपालला ख्रिस गेलची उपमा देणारी पोस्टही शेअर केली.

धोपटण्याने क्रिकेट खेळायचा महिपाल

महिपाल हा राजस्‍थानच्या नागौर येथील रहिवाशी असून बालपणीपासूनच को क्रिकेच खेळत आहे. त्याला क्रिकेटची आवड अगदी लहानपणीपासूनच होती. त्यामुळे तो 11 वर्षांचा असताना क्रिकेटमध्ये भविष्य बनवण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला आजीसोबत जयपूरला पाठवलं होतं. दरम्यान महिपालची आजी सिणगारी देवीने एका मुलाखतीत बालपणीचा एक किस्सा सांगितला होता. महिपाल क्रिकेट खेळण्यासाठी बॅटचा हट्ट करत असताना तिने त्याला कपडे धुवायचं धोपाटणं दिलं होतं. पुढे जाऊन महिपालने अनेक मैदानं गाजवली.

असं मिळालं ‘भारतीय ख्रिस गेल’ हे नाव

महिपालला राजस्थानमध्ये छोटा ख्रिस गेल म्हटलं जात. याचं कारण तो उंच-उंच षटकार ठोकण्यात चांगलाच तरबेज होता. तसंच तो लेग स्पीनरही आहे. दरम्यान अंडर 14 च्या वेरॉक शील्डच्या अंतिम सामन्यात लोमरोरने 250 हून अधिक धावा ठोकल्या. या खेळीनंतर त्याला भारताचे माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित यांनी भारतीय ख्रिस गेल असं नाव दिलं.

हे ही वाचा

RR vs PBKS: पंजाबला नमवल्यानंतर राजस्थानचा कार्तिक शर्ट काढून नाचला, ड्रेसिंग रुममध्ये आनंदोत्सव, पाहा VIDEO

IPL 2021: पंजाब किंग्सचा दीपक हुडा एका फोटोमुळे अडचणीत, BCCI करणार चौकशी, काय आहे ही पोस्ट?

मोठी बातमी: IPL मध्ये कोरोनाचा शिरकाव, सनरायजर्स हैद्राबाद संघाचा खेळाडू कोरोनाबाधित, 6 जण विलगीकरणात

(Rajstan royals player mahipal lomror played important knock in PBKS vs RR match he is know as indian Chris Gayle)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.