Ranji Trophy: पहिल्या 53 बॉलमध्ये एक रन्सही नाही, त्यानंतर ठोकलं शतक, मुंबईच्या यशस्वी जैस्वालने ‘दील जीत लिया’
रणजी करंडक स्पर्धेत (Ranji Trophy) मुंबई आणि उत्तर प्रदेश आमने-सामने (MUMvsUP) आहेत. दोन्ही संघांमध्ये सेमीफायनलचा सामना सुरु आहे. मुंबईकडून यशस्वी जैस्वालने (yashasvi jaiswal) दुसऱ्याडावात कमालीचा खेळ दाखवला.
मुंबई: रणजी करंडक स्पर्धेत (Ranji Trophy) मुंबई आणि उत्तर प्रदेश आमने-सामने (MUMvsUP) आहेत. दोन्ही संघांमध्ये सेमीफायनलचा सामना सुरु आहे. मुंबईकडून यशस्वी जैस्वालने (yashasvi jaiswal) दुसऱ्याडावात कमालीचा खेळ दाखवला. त्याने शतक ठोकलं. इनिंग सुरु केली, तेव्हा तो ट्रिपल फिगर पर्यंत पोहोचेल, अशी कोणीही कल्पना केली नव्हती. कारण पहिले 53 चेंडू खेळून त्याच्या खात्यात एक रन्सही नव्हता. 54 व्या चेंडूवर त्याने पहिली धाव घेतली. पृथ्वी शॉ बरोबर त्याची सलामीची भागीदारी पाहून ससा आणि कासवाची शर्यत सुरु आहे, असं वाटलं. त्या शर्यतीत जसा कासव जिंकला होता, इथे सुद्धा धीम्या गतीने खेळणाऱ्या यशस्वीचा विजय झाला. कारण त्याने पृथ्वी शॉ पेक्षा जास्त धावा केल्या.
टाळ्यांचा एकच कडकडाट झाला
पृथ्वी शॉ ने उत्तर प्रदेश विरुद्ध दुसऱ्याडावात अर्धशतक पूर्ण केलं. त्यावेळी यशस्वी जैस्वालने खातं सुद्धा उघडलं नव्हतं. पृथ्वी शॉ 71 चेंडूत 64 धावा करुन आऊट झाला. पृथ्वी बाद झाला तेव्हाही यशस्वीच्या खात्यात एक रन्सही नव्हता. त्याने 54 व्या चेंडूवर चौकार ठोकून खात उघडलं, त्यावेळी मुंबईच्या खेळाडूंनी एकच टाळ्यांचा कडकडाट केला.
240 पैकी पहिले 53 चेंडू निर्धाव होते
54 चेंडूनंतर यशस्वी जैस्वालने जो खेळ दाखवला, त्याला तोड नाही. त्याने यूपीच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली व शतक ठोकलं. दुसऱ्याडावात 240 चेंडूंवर त्याने शतक पूर्ण केलं. या 240 पैकी पहिले 53 चेंडू निर्धाव होते. म्हणजे यशस्वी 187 चेंडूत शतकी कामगिरी केली. यशस्वी जैस्वालच फर्स्ट क्लास करियरमधलं हे तिसरं शतक आहे. महत्त्वाचं म्हणजे यशस्वीने सलग तीन फर्स्ट क्लास शतक झळकावली आहेत.
दोन दिवसात पूर्ण केलं शतक
तिसऱ्यादिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी 114 चेंडूत 35 धावांवर नाबाद होता. म्हणजे 53 चेंडू वगळले तर त्याने 67 चेंडूत 35 धावा केल्या. चौथ्यादिवशी याच 35 धावांना त्याने शतकामध्ये बदललं. 126 चेंडूत 65 धावा फटकावून त्याने शतक पूर्ण केलं. त्याच्या फलंदाजीत किती संयम आणि धैर्य आहे, ते यातून दिसून आलं.
The art of surviving difficult periods on a tough pitch ?@ybj_19 held the fort from one end with a fighting ? and took Mumbai to a respectable total ?#MCA #Mumbai #Cricket #Wankhede #BCCI #RanjiTrophy #RanjiTrophy2022 pic.twitter.com/b88dpxOKkb
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) June 16, 2022
यशस्वीची सलग तीन शतकं
यशस्वी जैस्वालने रणजी करंडक 2022 च्या नॉकआऊट फेरीत सलग तीन शतक झळकावली आहेत. त्याने क्वार्टर फायनलच्या दुसऱ्याडावात शतक झळकावलं होतं. त्यानंतर सेमीफायनलच्या दोन्ही डावात दोन शतक झळकावली.