Ranji Trophy: 32 वर्षाच्या गोलंदाजाची कमाल, एकट्याने काढले 8 विकेट, 49 रन्सवर टीम ऑलआऊट

Ranji Trophy: काही दिवसांपूर्वी याच टीमने हरियाणाला 46 रन्सवर ऑलआऊट केलं होतं, ती टीम आज 50 धावाही करु शकली नाही.

Ranji Trophy: 32 वर्षाच्या गोलंदाजाची कमाल, एकट्याने काढले 8 विकेट, 49 रन्सवर टीम ऑलआऊट
Ranji Trophy Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 1:14 PM

नवी दिल्ली: देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत कमालीच प्रदर्शन पहायला मिळतय. 14 दिवसांपूर्वी एका टीमने हरियाणाला 46 रन्सवर ऑलआऊट केलं होतं. तीच टीम आता स्वत: 50 धावा करु शकली नाही. 49 रन्सवर ही टीम ऑलआऊट झाली. ऋषी धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिमाचल प्रदेशच्या टीमने खराब प्रदर्शन केलं. उत्तराखंड विरुद्धच्या रणजी सामन्यात हिमाचलची टीम 49 रन्सवर ऑलआऊट झाली.

टीमला सरेंडर करायला भाग पाडलं

उत्तराखंडच्या फक्त एका गोलंदाजामुळे हिमाचलची ही अवस्था झाली. दीपक धपोला नावाच्या गोलंदाजाने करिअरमधील सर्वोत्तम प्रदर्शन केलं. त्याने हिमाचलच्या फलंदाजांना विकेटवर टिकूच दिलं नाही. त्याने हिमाचलच्या टीमला सरेंडर करायला भाग पाडलं.

अशी वाट लावली

32 वर्षाच्या दीपक धपोलाने करिअरमधल सर्वोत्तम प्रदर्शन केलं. त्याने हिमाचल विरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये 35 धावा देऊन 8 विकेट काढल्या. इतकी भेदक गोलंदाजी केली की, हिमाचलचे 5 फलंदाज खातही उघडू शकले नाहीत. त्याशिवाय अन्य फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. फक्त एका बॅट्समनने 26 धावा केल्या. त्यामुळे टीमची धावसंख्या 49 पर्यंत पोहोचली. अन्यथा एवढ्या धावाही धावफलकावर लागल्या नसत्या. डेब्युमध्ये बिहारची वाट लावली

दीपक धपोलाने पहिल्यांदा अशी कामगिरी केलेली नाहीय. फर्स्ट क्लासमध्ये त्याने बिहार विरुद्ध डेब्यु केला होता. त्या पहिल्या सामन्यात त्याने 9 विकेट काढल्या होत्या. पहिल्या इनिंगमध्ये 6 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 3 विकेट काढलेल्या. आतापर्यंत खेळलेल्या 14 सामन्यात त्याने 61 विकेट काढल्यात. यात 5 वेळा 5 प्लस विकेट आणि 2 वेळा 10 पेक्षा जास्त विकेट काढल्यात.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.