Ranji Trophy मध्ये मुंबईच्या मुलाची कमाल, Sarfaraz khan चं वादळ, ठोकल्या 650 धावा, कोण रोखणार? VIDEO

मुंबईचा सर्फराज खान (Sarfaraz khan) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेत सर्फराजच्या बॅटमधून नुसता धावांचा पाऊस पडतोय.

Ranji Trophy मध्ये मुंबईच्या मुलाची कमाल, Sarfaraz khan चं वादळ, ठोकल्या 650 धावा, कोण रोखणार? VIDEO
Mumbai Cricketer sarfaraz khan Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 12:22 PM

मुंबई: मुंबईचा सर्फराज खान (Sarfaraz khan) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेत सर्फराजच्या बॅटमधून नुसता धावांचा पाऊस पडतोय. त्याच्यासमोर गोलंदाज निष्प्रभ होत आहेत. सध्या रणजीमध्ये क्वार्टर फायनलचे सामने सुरु आहेत. बेंगळुरमध्ये मुंबईच्या रणजी संघाचा उत्तराखंड विरुद्ध सामना (Mumbai vs Uttrakhand) सुरु आहे. या सामन्यात सर्फराजने अवघ्या 140 चेंडूत शतक ठोकलं. या शतकासह सीजनमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. सर्फराज खानने या सीजनमध्ये 650 पेक्षा जास्त धावा फटकावल्या आहेत. 623 धावांचा आकडा पार करुन त्याने चेतन बिष्टला मागे टाकलं. वैशिष्ट्य म्हणजे सर्फराजने फक्त पाच इनिंगमध्ये 150 पेक्षा जास्त सरासरीने या धावा केल्या आहेत.

या मुलाला कोण रोखणार?

मागच्या 13 रणजी सामन्यात सर्फराज खानने एक त्रिशतक, दोन द्विशतक आणि दोन शतक झळकावली आहेत. या सीजनमधलं सर्फराज खानचं हे तिसरं शतक आहे. सर्फराजचा स्ट्राइक रेटही 70 पेक्षा जास्त आहे. उत्तराखंड विरुद्धच्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये सर्फराजने 11 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने शतक झळकावलं. शतकासोबतच सर्फराजने सुवेज पारकरसोबत 200 पेक्षा पण जास्त धावांची भागीदारी केली.

कट, ड्राइव्ह सर्फराज खानची क्लासिक बॅटिंग पहाण्यासाठी इथे क्लिक करा

पृथ्वी शॉ-जैस्वालचा फ्लॉप शो

या सामन्यात मुंबईचा कॅप्टन पृथ्वी शॉ ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ 21 धावांवर आऊट झाला. यशस्वी जैस्वाल 35 धावांवर बाद झाला. अरमान जाफर 60 धावांची अर्धशतकी इनिंग खेळला. सुवेद पारकर आणि सर्फराज खानने शतक झळकवून उत्तराखंडला बॅकफूटवर ढकललं. नुकत्याच संपलेल्या आयपीएमध्ये सर्फराज खानच्या तुलनेत पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल चांगल्या फॉर्ममध्ये होते. त्यांनी बऱ्यापैकी धावा सुद्धा केल्या होत्या. मात्र रणजीमध्ये ते फ्लॉप ठरले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.