Arjun Tendulkar: तेंडुलकरसोबत पार्ट्नरशिप, डबल सेंच्युरी झळकवली, पण सर्वाधिक प्रसिद्धी फक्त अर्जुनला
Arjun Tendulkar: ज्या मॅचमध्ये अर्जुनने सेंच्युरी मारली, त्याच सामन्यात त्याने डबल सेंच्युरी झळकवली. कोण आहे तो गोव्याचा प्लेयर?
पणजी: अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफी स्पर्धेत कमाल केली. गोव्याकडून खेळताना राजस्थान विरुद्ध करिअरमधील पहिलं शतक झळकावलं. अर्जुनने 207 चेंडूत 120 धावा फटकावल्या. यात 16 चौकार आणि 2 षटकार होते. या इनिंगनंतर अर्जुन तेंडुलकरवर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. मीडियामध्ये अर्जुनच्या नावाची चर्चा आहे. त्याची 120 धावांची खेळी डबल सेंच्युरी मारणाऱ्या सुयश प्रभूदेसाईवर भारी पडली. त्याने 212 धावा केल्या. सुयशच्या डबल सेंच्युरीपेक्षा अर्जुनच्या शतकाची जास्त चर्चा आहे.
दोघांमुळे गोव्याने ओलांडला 500 धावांचा टप्पा
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात सुयश आणि अर्जुनने चांगली भागीदारी केली. दोघांनी मिळून गोव्याला चांगली धावसंख्या उभारुन दिली. दोघांमध्ये 221 धावांची भागीदारी झाली. गोव्याने 9 विकेटवर 547 धावांवर डाव घोषित केला.
सुयशने ठोकली डबल सेंच्युरी
सुयशने गोव्यासाठी सर्वाधिक धावा केल्या. पण सगळी लाइमलाइट अर्जुनला मिळाली. सुयशने त्याच्या द्विशतकी खेळीत 29 चौकार लगावले. सध्या तो फुल फॉर्ममध्ये दिसतोय. सुयशने 19 फर्स्ट क्लास सामन्यात 1158 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 8 अर्धशतक आहेत.
आरसीबीचा भाग
सुयश प्रभुदेसाई आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमचा भाग आहे. आरसीबीने लिलावात त्याला 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. आरसीबीकडून तो आपला पहिला सामना खेळला. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 18 चेंडूत त्याने 34 धावा केल्या. आयपीएलमध्ये त्याला फार संधी मिळाली नाही. 5 मॅचमध्ये सुयशने 67 रन्स केल्या.
राजस्थानची टीम किती धावांनी पिछाडीवर
लोअर ऑर्डरमध्ये अर्जुन तेंडुलकर बॅटिंगला आला होता. डेब्यु मॅचमध्येच अर्जुनने शतक ठोकलं. अर्जुनने या सामन्यात बॅटनंतर बॉलनेही कमाल केली. त्याने 2 विकेट घेतलेत. राजस्थानची टीम अजून 302 धावांनी पिछाडीवर आहे. शुक्रवारी सामन्याचा शेवटचा दिवस आहे.