Ranji Trophy: विष्णू नवजात बाळावर अंत्यसंस्कार करुन मैदानात परतला, थेट ठोकलं शतक
जवान, पोलीस, डॉक्टर आणि क्रीडापटूंसाठी कर्तव्य सर्वोच्च असतं. काही प्रसंगात त्यांना आपल्या व्यक्तीगत आयुष्यातील दु:ख बाजूला ठेवून कर्तव्य बजावाव लागतं. बडोद्याचा क्रिकेटपटू विष्णू सोलंकीने (Vishnu Solanki) सुद्धा आपल्या राज्य क्रिकेट संघासाठी अशीच सेवा बजावली आहे.
भुवनेश्वर: जवान, पोलीस, डॉक्टर आणि क्रीडापटूंसाठी कर्तव्य सर्वोच्च असतं. काही प्रसंगात त्यांना आपल्या व्यक्तीगत आयुष्यातील दु:ख बाजूला ठेवून कर्तव्य बजावाव लागतं. बडोद्याचा क्रिकेटपटू विष्णू सोलंकीने (Vishnu Solanki) सुद्धा आपल्या राज्य क्रिकेट संघासाठी अशीच सेवा बजावली आहे. काही दिवसांपूर्वी विष्णूच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. पण त्याने ते दु:ख विरुन शुक्रवारी चंदीगड विरुद्धच्या रणजी सामन्यात (Ranji Trophy 2022) शतकी खेळी साकारली. दुसऱ्यादिवसाच्या अखेरीस बडोद्याच्या सातबाद 398 धावा झाल्या होत्या. चंदीगडवर (Chandigarh) 230 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. पहिल्या डावात चंदीगडच्या संघाला बडोद्याने 168 धावात गुंडाळलं. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विष्णू सोलंकीने 161 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली. त्याच्या शतकी खेळीत 12 चौकार होते. सलामीवीर ज्योतस्नील सिंहने त्याला चांगली साथ दिली. धावबाद होण्यापूर्वी त्याने 96 धावांची खेळी केली. चंदीगडच्या गोलंदाजांवर बडोद्याच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवलं.
विष्णू सोलंकी भुवनेश्वरमध्ये असताना….
विष्णू सोलंकी बडोद्याच्या संघसहकाऱ्यांसोबत भुवनेश्वरमध्ये असताना त्याला आपल्या मुलीच्या मृत्यूची दुर्देवी बातमी समजली. अंत्यसंस्कारासाठी तो लगेच विमानाने वडोदऱ्याला गेला. तीन दिवसांनी तो पुन्हा विमानाने भुवनेश्वरला परतला.
हे सोपं नव्हतं
व्यक्तीगत दु:ख बाजूला ठेवून शतकी खेळी साकारणाऱ्या सोलंकीचं सौराष्ट्राचा विकेटकिपर फलंदाज शेल्डन जॅक्सनने कौतुक केलं आहे. “विष्णू एक मजबूत खेळाडू आहे. हे सोपं नव्हतं. विष्णू आणि त्याच्या कुटुंबाला माझा सलाम. अजून अशीच शतकं झळकवं. भरपूर यश मिळो” असं जॅक्सनने टि्वटमध्ये म्हटलं आहे.
What a player . Has to be the toughest player i have known. A big salute to vishnu and his family by no means this is easy? wish you many more hundreds and alot of success ?? pic.twitter.com/i6u7PXfY4g
— Sheldon Jackson (@ShelJackson27) February 25, 2022
“काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला गमावलं. तो अंत्यसंस्काराला गेला व लगेच संघाचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी पुन्हा परतला. सोशल मीडियावर त्याला लाइक्स मिळणार नाहीत. पण माझ्यासाठी विष्णू सोलंकी हिरो आहे. प्रेरणा आहे” असं बडोदा क्रिकेट असोशिएशनचे सीइओ शिशीर हट्टंगडी यांनी टि्वट केलं आहे.
Ranji Trophy Vishnu Solanki loses newborn daughter returns to field, hits hundred for Baroda