RR vs CSK IPL 2023 : ….आणि एमएसचा संयम सुटला, धोनी चिडल्याचा VIDEO व्हायरल
RR vs CSK IPL 2023 : मॅचमध्ये एका प्रसंगात धोनीला स्वत:वर नियंत्रण ठेवता आलं नाही. धोनी वैतागल्याच अपवादाने घडलय. काल राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात धोनी चिडल्याच दिसून आलं.
RR vs CSK IPL 2023 : क्रिकेट विश्वात एमएस धोनी कॅप्टन कुल म्हणून ओळखला जातो. दबावाखाली शांत, संयमाने स्थिती हाताळण्याच कौशल्य धोनीकडे आहे. या विशेष गुणासाठी त्याच कौतुकही होतं. धावांचा पाठलाग असो, किंवा बचाव, धोनी परिस्थिती आणि गरजेनुसार खेळतो. काल राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात धोनीचा एकदा नव्हे, दोनदा संयम सुटला. धोनीच चिडणं किंवा वैतागण ही दुर्मिळ बाब आहे. धोनी त्याच्या क्रिकेट करियरमध्ये वैतागल्याच अपवादाने घडलय.
त्यामुळे धोनीचा जेव्हा संयम सुटतो, त्याची चर्चा होते. कारण एमएस धोनी सारख्या खेळाडूकडून चाहत्यांना अशी अजिबात अपेक्षा नाहीय. पण गुरुवारी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात धोनी वैतागल्याच चित्र दिसलं.
नेमकं काय घडलं?
सामन्यातील 16 व्या ओव्हरमध्ये एमएस धोनीने थेट नॉन स्ट्राइक एन्डला थ्रो करुन स्टम्प उडवण्याचा प्रयत्न केला. पण बॅट्समन आरामात क्रीजमध्ये पोहोचला. बॉलर माथीशा पाथीराना पीचवर निम्म्यापर्यंत धावत आला होता. त्याने चुकून धोनीचा थ्रो उडवला. त्यावेळी धोनी वैतागल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. मीथाशाने चेंडू अडवण्याची गरज नव्हती, असं धोनीला सुचवायच होतं.
NEVER SEEN #Dhoni THIS ANGRY #CSKvRR #MSDhoni #csk #IPL2023 #ChennaiSuperKings #BCCI pic.twitter.com/Xn5y2ybovn
— Sakshi Dewangann (@SakshiDewangann) April 27, 2023
दुसऱ्यांदा धोनी कधी चिडला?
राजस्थान रॉयल्सच्या इनिंगमधील शेवटच्या चेंडूवर दुसऱ्यांदा एमएस धोनी वैतागला. देवदत्त पडिक्कलने लेग साइडला जोरदार हवाई शॉट खेळला. शिवम दुबेने तो चेंडू पकडला. पण त्याचा थ्रो अचूक नव्हता. बॅट्समनने त्याचा फायदा उचलत तीन धावा पळून काढल्या. त्यावर एमएस धोनीने आपली नाराजी व्यक्त केली. राजस्थानने रोखला CSK चा विजयरथ
या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 202 धावा केल्या. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने 43 चेंडूत 77 धावा फटकावल्या. अखेरीस ध्रुव ज्युरेल आणि देवदत्त पडिक्कलने चांगली फलंदाजी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेने 170 धावा केल्या. सीएसकेचा विजय रथ राजस्थानने रोखला. सीएसकेचा 32 धावांनी पराभव झाला.