Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs CSK : हार्दिकच्या ‘ब्रह्मास्त्रा’मुळे 4 बॉलमध्ये चेन्नई चीतपट, धोनी फक्त पाहत बसला, VIDEO

GT vs CSK IPL2023 : हार्दिकच्या ‘ब्रह्मास्त्रा’ने अचूक वार केल्यामुळे चेन्नईचा गेम ओव्हर. आधी बॉलिंग आणि नंतर बॅटिंगमध्ये या ‘ब्रह्मास्त्रा’ने आपली भूमिका चोख बजावली.

GT vs CSK : हार्दिकच्या ‘ब्रह्मास्त्रा’मुळे 4 बॉलमध्ये चेन्नई चीतपट, धोनी फक्त पाहत बसला, VIDEO
Hardik pandya - Ms DhoniImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 9:49 AM

GT vs CSK IPL2023 : आयपीएल 2023 ची सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात हार्दिक पंड्याने ब्रह्मास्त्र सोडलं, ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्सची टीम चीत झाली. पंड्याच्या ब्रह्मास्त्राचे हे 4 चेंडू एमएस धोनी सुद्धा पाहत बसला. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये आयपीएलच्या 16 व्या सीजनचा पहिला सामना खेळला गेला. पंड्याच्या गुजरातने या मॅचमध्ये बाजी मारली. राशिद खान गुजरातच्या विजयाचा हिरो ठरला. त्याच्या 4 चेंडूंनी चेन्नईचा खेळ संपवला.

आयपीएलमधील दुसरा यशस्वी संघ असलेला चेन्नईची टीम प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरली होती. त्यांनी 7 विकेट गमावून 178 धावा केल्या. सीएसकेसाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 50 चेंडूत 92 धावा ठोकल्या. त्याच्याशिवाय अन्य फलंदाज फार चालले नाहीत.

2 चेंडूत 2 खतरनाक फलंदाज OUT

राशिदने चेन्नईच्या 2 धोकादायक फलंदाजांना स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. राशिदने 6 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर मोइन अलीला आऊट केलं. मोइन अलीची इनिंग 23 धावात संपली. त्यानंतर त्याने सीएसकेला 70 धावांवर आणखी एक धक्का दिला. 8 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर राशिदने स्टोक्सला 7 रन्सवर माघारी धाडलं. राशिदच्या 2 चेंडूंनी चेन्नईला दोन मोठे धक्के दिले. अफगाणिस्तानचा हा स्टार प्लेयर तिथेच थांबला नाही. फलंदाजीची संधी मिळाली, तिथे सुद्धा त्याने आपली चमक दाखवून दिली.

लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या गुजरातला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये विजयासाठी 28 धावांची आवश्यकता होती. 19 व्या ओव्हरमध्ये राशिद खानने 2 चेंडूत गुजरातचा विजय सुनिश्चित केला. दीपक चाहर 19 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर त्याने मिडविकेटवरुन सिक्स मारला. पुढच्याच चेंडूवर चौकार खेचला. म्हणजे 2 चेंडूत 10 धावा वसूल केल्या. चेंडू आणि धावांमधील अंतर त्याने कमी केलं. लास्ट ओव्हरमध्ये गुजरातला विजयासाठी 8 धावांची गरज होती. त्यावेळी तेवतियाने काम पूर्ण केलं. 14 दिवसात 3 देशात केली कमाल

राशिद खान सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 14 दिवसात त्याने पाकिस्तानसह भारतात कमाल केली आहे. 18 मार्चला लाहोर कलंदर्सकडून खेळताना पीएसएलचा किताब जिंकला. त्यानंतर 27 मार्चला राशिदच्या नेतृत्वात अफगाणिस्तानने पाकिस्तान विरुद्ध ऐतिहासिक टी 20 सीरीज विजय मिळवला. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.