T20 world Cup च्या तोंडावर राशिद खाननं सोडलं कर्णधारपद, ‘हे’ आहे कारण

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघाने आपले खेळाडू जाहीर केले आहेत. पण ही घोषणा होताच कर्णधार राशिद खानने मात्र कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

T20 world Cup च्या तोंडावर राशिद खाननं सोडलं कर्णधारपद, 'हे' आहे कारण
राशिद खान
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 3:57 PM

मुंबई: अनेक अडचणीतून जाणारा अफगाणिस्तान देशाच्या क्रिकेट प्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संघाचा सर्वात मातब्बर खेळाडू आणि जगातील अव्वल फिरकीपटू राशिद खानने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने तसं जाहीर करत सोशल मीडिया पोस्टही केली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) गुरुवारी (9 सप्टेंबर)  T20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup) संघ जाहीर केला. त्यानंतर काही वेळातच राशिदने कर्णधारपदाता राजीनामा दिला आहे. राशिदने संघ निवडीदरम्यान माझ्याशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचं कारण देत राजीनामा दिला आहे.

राशिदने एक पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली त्याने पोस्टमध्ये राजीनाम्याचं कारणही लिहिलं आहे. त्याने लिहिलं आहे. ”मी संघाचा कर्णधार तसेच देशाचा एक नागरिकही आहे, असं असताना संघ निवडीदरम्यान माझ्याशी विचारविनीमय करणं गरजेचं होतं. पण असं काही झालं नाही निवड समिती आणि क्रिकेट बोर्डाने माझ्याशी कोणतीच चर्चा न केल्याने मी कर्णधार पद तात्काळ प्रभावाने सोडत आहे. अफगाणिस्तान देशासाठी खेळणं माझ्यासाठी कायम गर्वाची गोष्ट आहे. ”

मोहम्मद नबीला कर्णधारपद?

राशिदच्या राजीनाम्यानंतर संघाचा दुसरा मातब्बर खेळाडू आणि अष्टपैलू क्रिकेटर मोहम्मद नबीने (Mohmmed Nabi) एक सूचक ट्विट केलं आहे. त्याने लिहिलं आहे की, ”अशा अवघड वेळीही क्रिकेट संघ इतक्या मोठ्या स्पर्धेत भाग घेतोय याचं मी कौतुक करतो. आपण मिळून देशाला स्पर्धेत विजय मिळवून देऊ.” नबीच्या या सूचक ट्विटमुळे त्याला कर्णधारपद दिलं जाऊ शकतं, हे नक्की!

टी- 20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघ :

इंग्लंड संघ :राशिद खान, रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), हजरतुल्लाह ज़ज़ाई, उस्मान गनी, असगर अफगान, मुहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, हसमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जनत, गुलबदीन नायब, नवीन उल हक, हमीद हसन, शराफुद्दीन अशरफ, दौलत जादरान, शापूर जादरान आणि कॅस अहमद.

हे ही वाचा :

T20 world Cup 2021: शिखरच्या गैरहजेरीत रोहित बरोबर सलामीला कोण?, विराट नाही तर ‘या’ खेळाडूवर जबाबदारी

T20 world Cup 2021: भारतीय संघात 5 फिरकी गोलंदाज, इतके फिरकीपटू घेण्यामागे ‘हे’ आहे कारण

T 20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, अश्विनला संधी, शार्दूल ठाकूर रिजर्वमध्ये, धोनी मेंटरच्या भूमिकेत

(Rashid khan steps down as afghanistan captain before ICC mens t20 world cup)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.