मोठी बातमी : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना कोरोनाची बाधा, आणखी चार सदस्य विलगीकरणात

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना रंगतदार स्थितीत असतानाच एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाने शिरकाव केला आहे.

मोठी बातमी : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना कोरोनाची बाधा, आणखी चार सदस्य विलगीकरणात
रवी शास्त्री
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 4:00 PM

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात चौथी कसोटी इंग्लंडच्या ओवल मैदानात सुरु आहे. आज कसोटीचा चौथा दिवस असून भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना कोरोनाची लागण झाली आहे.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार शास्त्री कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्यांच्यासह चौघांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांचा समावेश आहे. सध्या चौथी कसोटी सुरु असून या सर्वांच्या अनुपस्थितीत भारतीय संघ खेळत आहे.

चौथ्या कसोटीत आतापर्यंत..

इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारत 99 धावांची आघाडी मिळवली होती. मात्र पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात चांगलीच मुसंडी मारली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (127) शतकी आणि चेतेश्वर पुजाराच्या (61) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 270 धावांपर्यंत मजल मारली आहे. अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा उर्वरित 40 मिनिटांचा खेळ रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला आहे. तत्पूर्वी भारताने 270 धावांपर्यंत मजल मारल्यामुळे भारताला 171 धावांची आघाडी घेतली आहे.

इतर बातम्या

IND vs ENG 4th Test Day 4 Live: मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी भारतीय सज्ज, विराट-जाडेजाची जोडी मैदानात

मॅचनंतर दादा ही कामं करायला सांगायचा, केबीसीच्या सेटवर सेहवाग-गांगुलीचा कलगीतुरा, बिग बी बघतच राहिले!

तो परत आला… भारताच्या गोलंदाजीवेळी Jarvo 69 मैदानात, इंग्लंडच्या फलंदाजाला दिला धक्का!

(Ravi shastri Corona postive Four members of team india support staff to remain in isolation)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.