Ravi Shastri : टी 20 वर्ल्ड कपनंतर कोच कोण? सौरव गांगुलीचे मोठे संकेत

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) हे सुद्धा टी 20 (T20) विश्वचषकानंतर पद सोडणार असल्याचं वृत्त आहे. टी 20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांचा करार संपणार आहे. यूएईमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी 20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या विश्वचषकानंतर टीम इंडियाचे (Team India) प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यासह दिग्गजांचे पत्ते कट होऊ शकतात.

Ravi Shastri : टी 20 वर्ल्ड कपनंतर कोच कोण? सौरव गांगुलीचे मोठे संकेत
सौरव गांगुली आणि रवी शास्त्री
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 11:33 AM

मुंबई : टी 20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियात (Team India) मोठे उलटफेर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli)  वन डे आणि टी 20 च्या कर्णधार पदावरुन मुक्त करणार असल्याचं वृत्त होतं. त्यानंतर आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) हे सुद्धा टी 20 (T20) विश्वचषकानंतर पद सोडणार असल्याचं वृत्त आहे. टी 20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांचा करार संपणार आहे. मात्र हा करार पुढे वाढवण्यास शास्त्री उत्सुक नसल्याचं सांगण्यात येत आहे.

त्यामुळे टी 20 विश्वचषकानंतर टीम इंडिया मोठ्या बदलाला सामोरं जाणार हे निश्चित आहे. दुसरीकडे प्रशिक्षकपदासाठी आता टीम इंडियाची ‘वॉल’ राहुल द्रविडचं (Rahul Dravid) नाव चर्चेत आहे. BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीनेही (Sourav Ganguly) तसे संकेत दिले आहेत.

दिग्गजांचे पत्ते कट होणार?

यूएईमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी 20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या विश्वचषकानंतर टीम इंडियाचे (Team India) प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यासह दिग्गजांचे पत्ते कट होऊ शकतात. यामध्ये गोलंदाजी कोच भरत अरुण, फिल्डिंग कोच आर श्रीधर आणि फलंदाजी कोच विक्रम राठोड यांचा समावेश असू शकतो. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे रवी शास्त्री यांच्यासोबत BCCI पुन्हा करार करण्याची शक्यता कमी आहे.

रवी शास्त्री यांनी यापूर्वी 2014 आणि 2016 च्या टी 20 विश्वचषकात टीम इंडियाचे संचालक म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर अनिल कुंबळे (Anil Kumble) हे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. 2017 मध्ये अनिल कुंबळे यांच्यानंतर रवी शास्त्री यांच्याकडे पूर्णवेळ प्रशिक्षकपदाची धुरा देण्यात आली. 2017 पासून रवी शास्त्री भारतीय संघाचे कोच म्हणून काम पाहात आहेत.

रवी शास्त्रींच्या कार्यकाळात ICC जेतेपद नाहीच

दरम्यान, रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात टीम इंडिया 2019 वर्ल्डकप सेमीफायनल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पराभूत झाली. आतापर्यंत रवी शास्त्री यांच्या नेतृत्त्वात भारतीय संघ आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकू शकली नाही.

राहुल द्रविडचं नाव चर्चेत, दादाचे संकेत

दरम्यान, राहुल द्रविडला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक करण्याबाबतचे संकेत खुद्द सौरव गांगुलीने दिले आहेत. दे टेलिग्राफशी बोलताना दादा म्हणाला, “आम्ही अजून द्रविडसोबत याबाबतीत चर्चा केलेली नाही. मी समजू शकतो की द्रविडला परमनंट मुख्य प्रशिक्षक होण्यात रस नाही. मात्र अजूनही आम्ही याबाबत कोणतीच चर्चा केलेली नाही. जेव्हा ही चर्चा करण्याचा विचार करु, तेव्हा पाहू, असं सौरव गांगुली म्हणाला.

द्रविडच्या प्रशिक्षणात टीम इंडियाला यश

दरम्यान, राहुल द्रविडने भारताच्या अंडर 19 आणि इंडिया A संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं आहे. 2016 च्या अंडर 19 विश्वचषकात भारतीय संघाला उपविजेते पद मिळालं. तर 2018 मध्ये टीम इंडियाने अंडर 19 विश्वचषक जिंकला होता. नुकतंच जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर होता. त्यावेळी शिखर धवनच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा राहुल द्रविडकडे होती. भारताने ही वन डे मालिका जिंकली होती.

संबंधित बातम्या 

टीम इंडियाच्या मागे ‘द वॉल’ उभा राहणार, राहुल द्रविड लवकरच रवी शास्त्रींची जागा घेणार?

टीम इंडियात मोठ्या बदलाच्या हालचाली, रवी शास्त्री टीम इंडियाचे प्रशिक्षकपद सोडणार?

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.