मुंबई : आपल्या रोखठोख भूमिकांमुळे नेहमी चर्चेत असलेले भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी आज पुन्हा एकदा बीसीसीआयवर निशाना साधला आहे. यंदा निमित्त आहे ते रणजी ट्रॉफी 2022 च्या (Ranji trophy 2022) आयोजनाबाबत. गेल्या वर्षी कोरोनामुळे स्पर्धेच्या आयोजनावर मर्यादा आल्या होत्या. यंदाही रणजी स्पर्धेच्या आयोजनाबाबत बीसीसीआयकडून कुठलेही सुतोवाच करण्यात आलेले नाही. रणजी ट्रॉफीच्या आयोजनाबाबत साशंकता आहे. आतापर्यंत भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय ही स्पर्धा कधी होणार हे ठरवू शकलेले नाही. रवी शास्त्री यांनी रणजी ट्रॉफीला भारतीय क्रिकेटचा कणा असल्याचे म्हटले आहे. सलग दुसऱ्या वर्षी रणजी ट्रॉफीच्या आयोजनाबाबत शंका असताना भारतीय क्रिकेट संघाच्या माजी मुख्य प्रशिक्षकाने हे वक्तव्य केले आहे. देशातील सर्वात मोठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा कशी आणि केव्हा आयोजित करायची हे बीसीसीआयने अद्याप ठरवलेले नाही. रवी शास्त्री यांनी 28 जानेवारी रोजी रणजी ट्रॉफीबद्दल ट्विट (tweet) केले. त्यात त्यांनी लिहिले, की ‘रणजी ट्रॉफी हा भारतीय क्रिकेटचा कणा (backbone of Indian Cricket) आहे. ज्या क्षणी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करायला लागाल, त्याच क्षणी आपलं क्रिकेट हे कणाहीन बनेल.
रवी शास्त्रींनी या ट्विटद्वारे बीसीसीआयवर निशाना साधला आहे. शास्त्री हे सात वर्षे भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफचा भाग होते. अशा परिस्थितीत त्यांनी रणजी स्पर्धेच्या आयोजनाचा मुद्दा उपस्थित केल्याने बोर्डावर स्पर्धेच्या आयोजनाबाबत दबाव येऊ शकतो. 2020-21 च्या हंगामात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले नव्हते. कोरोनामुळे हे घडले नाही.
रणजी स्पर्धेत 38 संघ सहभागी होतात. ही स्पर्धा 13 जानेवारीपासून आयोजित केली जाणार होती. परंतु कोविडच्या तिसऱ्या लाटेमुळे ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआयची 27 जानेवारीला बैठक झाली. दोन टप्प्यात ट्रॉफीचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. 27 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आयोजित करण्याची बीसीसीआयची योजना आहे आणि अशा परिस्थितीत रणजी ट्रॉफी एका टप्प्यात आयोजित करणे शक्य वाटत नाही. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी बैठकीनंतर ‘पीटीआय’ला सांगितले की, ‘आम्ही रणजी ट्रॉफीच्या आयोजनाची शक्यता तपासत आहोत. आता कोरोना केसेस कमी होताना दिसत आहेत. आयपीएल व रणजीच्या नियोजनावर काम सुरु आहे.
The Ranji Trophy is the backbone of Indian cricket. The moment you start ignoring it our cricket will be SPINELESS!
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) January 28, 2022
इतर बातम्या
ICC Women’s Cricketer 2021: विराट-रोहितला जमलं नाही ते सांगलीच्या स्मृती मानधनाने करुन दाखवलं