WTC स्पर्धेत अश्विनचा डंका, सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड, कांगारु बोलरला पछाडलं!

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आर अश्विनने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला पछाडलं आहे. (Ravichandran Ashwin Became highest Wicket taker In World Test Championship Tournament)

WTC स्पर्धेत अश्विनचा डंका, सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड, कांगारु बोलरला पछाडलं!
आर अश्विन
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 2:43 PM

मुंबई : जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यापर्यंतचा (WTC Final 2021) भारताचा प्रवास मोठ्या कष्टाने झाला होता. विश्वविजेता बनण्याची संधी केवळ एक पाऊल दूर होती. मात्र अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. मात्र या सगळ्या स्पर्धेत भारताचा फिरकीपटू आर अश्विनने (R Ashwin) चमकदार कामगिरी केली. त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. (Ravichandran Ashwin Became highest Wicket taker In World Test Championship Tournament)

WTC स्पर्धेत अश्विनचा डंका

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आर अश्विनने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला पछाडलं आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेला साउथहॅम्प्टन कसोटीत अश्विनने हे यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं. अश्विनने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 14 सामन्यात 71 विकेट्स मिळवल्या. न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवे याला आऊट करत अश्विनने कमिन्सला पछाडलं. अश्विनने 26 डावात 71 विकेट्स आपल्या नावे केल्या तर कमिन्सने 28 डावात 70 विकेट मिळवल्या.

अश्विनला दोन मोठे रेकॉर्ड मोडण्याची संधी

अश्विनला आणखी एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. अश्विनच्या कसोटी कारकिर्दीवर आपण एक नजर टाकली तर अश्विनच्या खात्यात सध्या 413 विकेट आहेत. दुसरीकडे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमच्या नावावर 414 विकेट्स आहेत. म्हणजेच वसीम अक्रम याच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याला अश्विनला केवळ एक विकेट हवी आहे.

तर भारताचा दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या नावावर 417 विकेट्स आहेत. हरभजनची बरोबरी करण्याचा आश्विनला आणखी चार विकेटची गरज आहे. येत्या काही दिवसांतच अश्विन अक्रम आणि हरभजनचा रेकॉर्ड मोडण्याची आशा आहे.

अश्विनचं टेस्ट करिअर

रविचंद्रन अश्विन याने 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने भारताकडून आतापर्यंत 79 कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये 413 विकेट्स त्याने घेतल्या. अश्विने 30 वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत तर 7 वेळा त्याने एकाच सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. बॉलिंगशिवाय आपला बॅटिंग परफॉर्मन्स देखील अश्विनने दाखवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनच्या नावावर 5 शतकं आहेत. त्याने 27.8 68 च्या सरासरीने 2 हजार 685 धावा केल्या आहेत. तर त्याच्या नावावर अकरा अर्धशतक देखील आहेत.

(Ravichandran Ashwin Became highest Wicket taker In World Test Championship Tournament)

हे ही वाचा :

टीम इंडियाच्या ‘या’ बॅट्समनचं स्थान धोक्यात?, विराट कोहलीने इशाऱ्या इशाऱ्यात सांगितलं!

WTC Final : न्यूझीलंडकडून पराभवानंतर निराश विराटची मोठी वक्तव्य, कसोटी संघात होणार बदल, काय म्हणाला कोहली?

WTC Final : भारतीय संघाच्या पराभवानंतर विराटसह विल्यमसनही भावूक, फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.