आयपीएल 2021 मध्ये आज अबू धाबीच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये सामना खेळवला जात आहे. राजस्थानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही संघांनी त्यांचा मागील सामना जिंकला आहे. ज्या पद्धतीने राजस्थानने पंजाब किंग्जचा पराभव केला, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूपच वाढला असेल. अशा स्थितीत अबू धाबी येथे होणाऱ्या आज च्या सामन्यात मोठी चुरस पाहण्याची संधी मिळणार आहे. आजच्या सामन्यात काही विक्रमही केले जातील. आज सर्वांच्या नजरा दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज रवीचंद्रन अश्विन (Ashwin) आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन Sanju Samson) यांच्यावर असतील. हे दोन्ही खेळाडू मोठा विक्रम करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहेत.