मोठी बातमी: Ravindra jadeja ने CSK ची कॅप्टनशिप सोडली, पुन्हा MS Dhoni कॅप्टन
Ravindra jadeja CSK: धोनीने बरीचवर्ष कर्णधारपद भुषवल्यानंतर रवींद्र जाडेजाकडे कॅप्टनशिप सोपवली होती. चेन्नई आयपीएलमधला गतविजेता संघ आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत एक मोठी गोष्ट घडली आहे. रवींद्र जाडेजाने (Ravindra jadeja) चेन्नई सुपर किंग्सची (CSK) कॅप्टनशिप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. IPL 2022 मध्ये टीमच्या खराब प्रदर्शनानंतर रवींद्र जाडेजाने पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीकडे (MS Dhoni) कॅप्टनशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. रवींद्र जाडेजाला आयपीएल 2022 स्पर्धा सुरु होण्याच्या दोन दिवस आधी कर्णधारपदावर नियुक्त करण्यात आलं होतं. धोनीने बरीचवर्ष कर्णधारपद भुषवल्यानंतर रवींद्र जाडेजाकडे कॅप्टनशिप सोपवली होती. चेन्नई आयपीएलमधला गतविजेता संघ आहे. पण तरीही त्यांना .यंदाच्या सीजनमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. आठ पैकी सहा सामने चेन्नईने गमावले आहेत. पॉइंटस टेबलमध्ये चेन्नईचा संघ नवव्या स्थानावर आहे.
म्हणून जाडेजाने सोडली कॅप्टनशिप
CSK च्य़ा नवव्या सामन्याआधी शनिवारी 30 एप्रिलला फ्रेंचायजीने या बदलाची घोषणा केली आहे. “रवींद्र जाडेजाने आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कॅप्टनशिप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने एमएस धोनीला पुन्हा कॅप्टनशिप संभाळण्याचा आग्रह केला आहे. एमएस धोनीने सगळ्यांच हित लक्षात घेऊन CSK ची कॅप्टनशिप संभाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जाडेजाला आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करता येईल” असं सीएसकेने सोशल मीडिया अकाऊंटवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
? Official announcement!
Read More: ?#WhistlePodu #Yellove ?? @msdhoni @imjadeja
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 30, 2022
चॅम्पियन चेन्नईची वाईट अवस्था
CSK ला चारवेळा चॅम्पियन बनवणाऱ्या धोनीने स्पर्धेच्या दोन दिवस आधी कॅप्टनशिप सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याने टीमचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाला उत्तराधिकारी म्हणून निवडलं होतं. जाडेजा पहिल्यांदाच सिनियर लेवलवर कॅप्टनशिप भुषवूत होता. नवीन कॅप्टन आणि बदललेल्या संघासह सीएसकेने खूपच खराब प्रदर्शन केलं. पहिले चार सामाने सीएसकेचा संघ हरला. त्यांना फक्त दोन मॅचमध्ये विजय मिळाला. सीएसकेचा उद्याचा सामना एक मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध आहे. धोनी संघाचे नेतृत्व संभाळणार आहे.