IND vs ENG: तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ खेळाडू संघाबाहेर, लॉर्ड्स कसोटीत विजयानंतरही संघात बदलाची शक्यता
भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत 151 धावांनी मात देत मालिकेमध्ये 1-0 ची आघाडी मिळवली आहे. ज्यामुळे आता तिसऱ्या कसोटीकडे दोन्ही संघाचे लक्ष लागून आहे.
लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी अप्रतिम सांघिक खेळाचे दर्शन घडवत इंग्लंडवर 151 धावांनी विजय मिळवला. या विजयासह मालिकेतही भारताने 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटीतही विजयाची मालिका कायम राखण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असले. पण त्यासाठी भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली.
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) या तिसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. याचे कारण पहिल्या दोन्ही कसोटींत संधी मिळाल्यानंतरही जाडेजाने काही खास कामगिरी केलेली नाही. त्यातच दुसऱ्या कसोटीमध्ये इंग्लंडचा अष्टपैलू फिरकीपटू मोईन अलीने भारताचे महत्त्वाचे दोन विकेट घेतले. पण जाडेजाला मात्र एकही विकेट घेता न आल्याने तिसऱ्या सामन्यात त्याला संघाबाहेर ठेवले जाऊ शकते.
आश्विनला संधी मिळण्याची शक्यता
रवींद्र जाडेजाला उत्तम पर्याय म्हणून रवीचंद्रन आश्विनला संधी मिळू शकते. सध्या जागतिक क्रिकेटमधील उत्कृष्ट फिरकीपटूमध्ये अव्वल क्रमांकावर असणारा आश्विन फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात जाडेजाच्या जागी अंतिम 11 मध्ये आश्विनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
भारत आणि इंग्लंडमधील उर्वरीत कसोटी मालिकांचे वेळापत्रक
पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट (सामना अनिर्णीत)
दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट (भारत विजयी)
तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट
चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर
पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.
इतर बातम्या
IND vs ENG : बुमराह नडला, सिराज लॉर्ड्सवर थेट भिडला, भारताचा इंग्लंडवर थरारक विजय
IND vs ENG : लॉर्ड्सवरील विजयानंतर विराट आणि रोहितचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO
(Ravindra jadeja may not be in playing 11 for third test against england at leeds)