T 20 वर्ल्ड कप आधी टीम इंडियाला मोठा झटका
टीम इंडियातील (Team India) खेळाडूंच्या दुखापतीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. T 20 वर्ल्ड कप स्पर्धेआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.
मुंबई: टीम इंडियातील (Team India) खेळाडूंच्या दुखापतीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. T 20 वर्ल्ड कप स्पर्धेआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. संघातील स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाची (Ravindra jadeja) गुडघे दुखापत गंभीर आहे. याच दुखापतीमुळे त्याला आशिया कप स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. आता पुढच्या महिन्यापासून ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) स्पर्धा होणार आहे. त्यातही तो सहभागी होऊ शकणार नाही, अशी माहिती आहे.
बीसीसीआयसमोर रवींद्र जाडेजाच्या फिटनेसचा प्रश्न गंभीर आहे. रवींद्र जाडेजावर सर्जरी होणार आहे. त्यामुळे त्याला दीर्घकाळ मैदानाबाहेर रहावे लागेल, असं बीसीसीआयच्या हवाल्याने पीटीआयने वृत्त दिलय.
रोहित शर्मसाठी सुद्धा झटका
रवींद्र जाडेजा टीम इंडियासोबत यूएई मध्ये होता. आशिया कप स्पर्धेत भारताकडून त्याने दोन सामने खेळले. पाकिस्तान आणि हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तान विरुद्ध त्याने 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दुसऱ्यासामन्यात किफायती गोलंदाजी करताना महत्त्वाची विकेट घेतली. एक रनआऊट केला. त्यामुळे अशा खेळाडूची अनुपस्थिती रोहित शर्माच्या टीमसाठी एक मोठा झटका आहे.
रवींद्र जाडेजावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल
रवींद्र जाडेजाला झालेली दुखापत गंभीर आहे. तो मैदानावर कधी पुनरागमन करेल, ते निश्चितपणे सांगता येत नाही. जाडेजाच्या गुडघ्याची दुखापत गंभीर आहे. त्याच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल. त्याला अनिश्चित काळासाठी मैदानाबाहेर रहावं लागेल. एनसीएच्या मेडिकल टीमनुसार, तो मैदानात कधी परतणार, ते ठोसपणे सांगता येणार नाही. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने पीटीआयने हे वृत्त दिलय.
एंटीरियर क्रुशिएट लिगामेंटचा विषय
जाडेजाच्या दुखापतीच स्वरुप कसं आहे, ते आताच स्पष्टपणे सांगता येणार नाही. जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यातही याच दुखापतीमुळो तो त्रस्त होता. वनडे आणि टी 20 सीरीजचे काही सामने खेळला नव्हता. हा एंटीरियर क्रुशिएट लिगामेंटचा विषय आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी कमीत कमी 6 महिन्याचा कालावधी लागतो. जाडेजा कमीत कमी तीने महिने मैदाबाहेर राहणार असं म्हटलं जातय.