T20 world Cup : रविंद्र जाडेजा ते आर अश्विन, फिरकीच्या जोडीला शमी-बुमराह-भुवीचं वेगवान अस्त्र, भारतीय गोलंदाजांचा ताफा कसा?
भारतीय फलंदाजांचा नेहमीसारखाच तगडा ताफा टी ट्वेन्टी वर्ल्ड कपसाठी जाहीर करण्यात आलाय. तितक्याच तोडीस तोड गोलंदाजीचं आक्रमण देखील असणार आहे. यावेळी वेगवान गोलंदाजीला फिरकीची उत्तम साथ मिळणार आहे.
मुंबई : आगामी बहुचर्चित टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि जय शाह यांच्या नेतृत्वाखालील कमिटीनेे भारताच्या 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. विराट कोहलीवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे तर रोहित शर्मावर कर्णधारपदाची जबाबदारी आहे. भारतीय फलंदाजांचा नेहमीसारखाच तगडा ताफा टी ट्वेन्टी वर्ल्ड कपसाठी जाहीर करण्यात आलाय. तितक्याच तोडीस तोड गोलंदाजीचं आक्रमण देखील असणार आहे. यावेळी वेगवान गोलंदाजीला फिरकीची उत्तम साथ मिळणार आहे. 15 सदस्यीय संघात तीन वेगवान गोलंदाजांसह चार फिरकीपटूंना संधी देण्यात आली आहे.
TEAM – Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), KL Rahul, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Rahul Chahar, Ravichandran Ashwin, Axar Patel, Varun Chakravarthy, Jasprit Bumrah, Bhuvneshwar Kumar, Mohd Shami.#TeamIndia
— BCCI (@BCCI) September 8, 2021
एकूण 8 गोलंदाज
बीसीसीआयने टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी एकूण 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने वर्ल्डकपमध्ये प्रतिस्पर्ध्याना आस्मान दाखवाण्यासाठी सक्षम असा तगडा संघ जाहीर केला. 15 पैकी 8 खेळाडू हे गोलंदाज (वेगवान+फिरकीपटू) आहेत. यात आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार अशा तोडीसतोड गोलंदाजांचा समावेश आहे.
अश्विन-जाडेजाच्या जोडीला आणखी 3 फिरकी गोलंदाज
फिरकी गोलंदाजीची जबाबदारी ही अश्विन, जाडेजा, अक्षर पटेल आणि राहुल चहर आणि वरुण चक्रवर्ती यांच्या खांद्यावर असणार आहे. फलंदाजी ही जाडेजा, अश्विन आणि राहुल चहर यांची जमेची बाजू आहे. गेल्या काही महिन्यांपासून रविंद्र जाडेजा अष्टपैलू कामगिरी करत आहेत. त्यामुळे जाडेजाकडून टीम इंडियाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. जाडेजाने त्याच्या कसोटी कारकिर्दीत साऊथम्पटनमध्ये 1 सामना खेळला आहे. त्यामध्ये जाडेजाने 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर इंग्लंड दौऱ्यातही जाडेजाने महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. जाडेजाची ही कामगिरी टीम इंडियासाठी आशादायक आहे. दुसरीकडे अश्विनचं चार वर्षानंतर टी ट्वेन्टीमध्ये पुनरागमन झालं आहे. परंतु त्याच्याकडे अनुभवाचा कोष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो आंतरराष्ट्रीय सामने खेळतो आहे. तसंच तो याअगोदर वर्ल्डकपमध्येही खेळलेला आहे. त्यामुळे जाडेजाच्या साथीला अश्विनची खंबीर साथ असणार आहे.
अश्विन जाडेजाच्या जोडीला अक्षर पटेल, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती यांचीही साथ असणार आहे. राहुल चहर आणि वरुण चक्रवर्ती या फिरकीपटूंना पहिल्यांदाच वर्ल्कप खेळण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचं ते नक्कीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही.
वेगवान गोलंदाजीचा ताफा कसा?
दुसरीकडे वेगवान गोलंदाजीमध्ये भारताकडे जास्त पर्याय उपलब्ध नाहीत. पण ज्यांचा संघात समावेश केलाय ते प्रतिस्पर्ध्यांची दांडी गुल करण्यास कधीही सज्ज आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्यावर वेगवान आक्रमणाचा भार असणार आहे. तिन्ही गोलंदाज इनस्विंग आणि आऊटस्विंग करण्यास माहिर आहेत. तर तिघेही अतिशय उत्तम यॉर्कर टाकू शकतात, ही त्यांची तगडी बाजू आहे. एकंदरितच
टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
राखीव: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर
भारताचे विश्वचषकातील सामने
भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-
- भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
- भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
- भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
- भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)
या ठिकाणी रंगणार विश्वचषकाचे सामने
आधी भारतात पार पडणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे आता युएई आणि ओमान देशांत खेळवला जाणार आहे. काही दिवासांपूर्वीच बीसीसीआय़ आणि आयसीसी यांनी संयुक्त बैठकीतून हा निर्णय घेतला होता. दरम्यान युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेचे सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबु धाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी मैदान याठिकाणी खेळवले जाणार आहेत.
हे ही वाचा :