CSK च्या वादामुळे Ravindra Jadeja-एमएस धोनीची मैत्री तुटली? कारण त्या दिवशी…
IPL 2022 च्या मध्यापासूनच रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) आणि चेन्नई सुपर किंग्सचे संबंध बिघडले होते. स्पर्धा सुरु असतानाच, संघाच्या खराब प्रदर्शनामुळे CSK ने जाडेजला कॅप्टनशिपवरुन हटवलं.
मुंबई: IPL 2022 च्या मध्यापासूनच रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) आणि चेन्नई सुपर किंग्सचे संबंध बिघडले होते. स्पर्धा सुरु असतानाच, संघाच्या खराब प्रदर्शनामुळे CSK ने जाडेजला कॅप्टनशिपवरुन हटवलं. पुन्हा एकदा एमएस धोनीकडे (MS Dhoni) संघाची सूत्र सोपवली होती. आता जाडेजा आणि एमएस धोनी मध्ये सुद्धा सर्व काही आलबेल नसल्याचं समजतय. जाडेजाने एक पाऊल उचललय. त्यावरुन हा तर्क लावला जातोय. रवींद्र जाडेजाने CSK शी संबंधित आपल्या सर्व पोस्टस इन्स्टाग्रामवरुन हटवल्या आहेत. त्याने आय़पीएल 2021 आणि 2022 मधील कॅम्पेनशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. रवींद्र जाडेजा आणि धोनीची मैत्री सुद्धा आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. जाडेजाने सीएसकेचा कॅप्टन आणि आपला मित्र एमएस धोनीला वाढदिवसाच्या साध्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. 7 जुलै हा धोनीचा वाढदिवस आहे. या दिवशी वेगवेगळ्या लोकांनी माहीला शुभेच्छा दिल्या. पण यात जाडेजा कुठे नव्हता.
मध्यावरच कर्णधारपद सोडलं
आयपीएल 2022 च्या सुरुवातीला रवींद्र जाडेजाला सीएसकेच कॅप्टन बनवण्यात आलं होतं. पण कॅप्टन म्हणून जाडेजा प्रभावी वाटला नाही. सीएसकेने सलग सुरुवातीचे काही सामने गमावले. त्याने स्पर्धेच्या मध्यावरच कर्णधारपद सोडलं व धोनीने पुन्हा एकदा सूत्र संभाळली. आयपीएल 2022 च्या शेवटच्या काही सामन्यात जाडेजा खेळला सुद्धा नाही. तो दुखापतग्रस्त असल्याचं कारण देण्यात आलं. त्यावेळीच सीएसके आणि रवींद्र जाडेजा मध्ये फिस्कटल्याच्या बातम्या आल्या. फ्रेंचायजीने या सर्व बातम्या चुकीच्या असल्याच्या म्हटल्या होत्या. अलीकडेच सीएसकेने आपल्या इन्स्टाग्रमा अकाउंटवर एक पोस्ट केली होती. त्यात वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवींद्र जाडेजाला उपकर्णधार बनवलं, म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.
इंग्लंड मध्ये जोरदार कमबॅक
आयपीएल 2022 चा सीजन रवींद्र जाडेजासाठी खूपच वाईट ठरला. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने सुरुवातीच्या चार मॅच गमावल्या. 10 सामन्यात त्याने फक्त 116 धावा करुन 5 विकेट घेतल्या. इंग्लंड विरुद्ध याच जाडेजाने जोरदार पुनरागमन केलं. एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात त्याने शतकी खेळी केली. ऋषभ पंत सोबत सहाव्या विकेटसाठी त्याने 222 धावांची भागीदारी सुद्धा केली. या कसोटी सामन्यात पहिले तीन दिवस खेळावर वर्चस्व ठेऊन सुद्धा भारताचा पराभव झाला.