Ravindra jadeja : रविंद्र जडेजावर लागला होता ipl च्या एका सीझनचा बॅन, मुंबईकडे जास्त पैसे मागितल्याचा ठपका
राजस्थानशी कॉन्ट्रॅक्ट असताना रविंद्र जडजावर आयपीएलच्या नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. जडेजा इतर टीमशी जास्त पैसे घेण्यासाठी मोलभाव करत असल्याचा आरोप जडेजावर झाला होता.
भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला आपण अनेकदा सामन्याचं पारडं पलटताना बघितलं आहे. रविंद्र जडेजा हा एक उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. रविंद्र जडेजावर आयपीएलच्या एक सीझनचा बॅन लागला होता. एवढ्याचमकदार खेळाडूवर एका सीझनसाठी बॅन लागल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. रविंद्र जडेजाने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना अनेक सीझन गाजवले आहेत.
मुंबईशी जास्त पैशांसाठी मोलभाव महागात
रविंद्र जडेजा आयपीएलचा पहिला सीझन राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. पहिलं आयपीएलचं विजेतेपद जिंकण्याची किमया यावेळी राजस्थान रॉयलने केली होती. रविंद्र जडेजाची या सीझनमध्ये कामगिरीही उत्तम होती. राजस्थान रॉयलचे कर्णधार शेन वॉर्न जडेजाच्या कामगिरीने प्रभावित झाले होते. मात्र राजस्थानशी कॉन्ट्रॅक्ट असताना रविंद्र जडजावर आयपीएलच्या नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. जडेजा इतर टीमशी जास्त पैसे घेण्यासाठी मोलभाव करत असल्याचा आरोप जडेजावर झाला होता. त्यामुळेच रविंद्र जडेजा आयपीएलचा 2010 चा सीझन खेळू शकला नव्हाता. मुंबई इंडियन्स टीमलाही ललित मोदी यांनी तंबी दिली होती.
लखनऊनच्या नव्या टीमवर अमिष दिल्याचा आरोप
यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नवे संघ सामील होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामध्ये लखनऊ आणि अहमदाबाद फ्रेंचाईजीची नावे समोर आली आहेत. त्यामुळे स्पर्धा आणखी रंगतदार होणार आहे. पण लखनऊच्या टीमवर इतर टीममधील खेळाडुंना अमिष दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. लखनऊच्या टीमने पंजाब टीमचा कर्णधार के. एल. राहुल आणि हैदराबाद टीममधील राशिद खान यांना मोठी रक्कम ऑफर केल्याच्या चर्चा आहेत. तर अहमदाबाद टीमशी संबंधित कंपनीचे सट्टेबाजांशी कनेक्शन असल्याचा आरोप होत आहे.