लिलावात खर्च करण्यासाठी आरसीबीकडे फक्त 3.25 कोटी रुपये, रिटेन्शननंतर या पैशातच घ्यावे लागणार खेळाडू
वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेसाठी रिटेन्शन यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी स्पर्धेआधी मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे फ्रेंचायझींनी काही खेळाडू रिलीज करत डाव साधला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मागच्या पर्वात जेतेपद मिळवलं होतं. पण यंदा सात खेळाडूंना रिलीज केलं आहे.
आयपीएल स्पर्धेपूर्वी वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा पार पडणार आहे. यासाठी पाचही फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. या स्पर्धेपूर्वी मिनी लिलाव पार पडणार आहे. तत्पूर्वी आरसीबीने 2017 आयसीसी वर्ल्डकप विजेत्या इंग्लंडच्या अष्टपैलू डॅनियल व्याट होडगेला आपल्या संघात घेतलं आहे. ट्रेड विंडोच्या माध्यमातून हा करार पूर्ण झाला होता. आता आरसीबीने मिनी लिलावापूर्वी 14 खेळाडूंना रिटेन केलं आहे. तसेच 7 खेळाडूंना रिलीज केलं आहे. मिनी लिलाव असल्याने फ्रेंचायझींनी जास्तीत जास्त खेळाडू कायम ठेवले आहेत.बीसीसीआयच्या नियमांनुसार, प्रत्येक फ्रँचायझीला संघात 18 खेळाडू संघात ठेवायचे आहेत. त्यापैकी 6 विदेशी खेळाडू असतील. पण काही दिवसांपूर्वीच डॅनियल व्याटला ट्रेडिंगद्वारे विकत घेतल्याने विदेशी खेळाडूंची संख्या 8 झाली आहे. त्यामुळे आरसीबीने इंग्लंडची कर्णधार हीथर नाइट आणि दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू नदिन डी क्लार्क यांची संघातून रिलीज केलं आहे.
आरसीबीने दिशा कसाट, इंद्राणी रॉय, नदीन डी क्लार्क, शुभा सतीश, श्रद्धा पोकरकर, सिमरन बहादूर, हेदर नाइट. यांना रिलीज केलं आहे. तर स्मृती मानधना (कर्णधार), सबिनेनी मेघना, ऋचा घोष, एलिस पेरी, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, सोफी मॉलिनक्स, एकता बिश्त, केट क्रॉस, कनिका आहुजा, डॅनियल व्याट या खेळाडूंना कायम ठेवलं आहे. आता आरसीबीच्या ताफ्यात 14 खेळाडू असून 4 खेळाडू घेणं भाग आहे. हे चारही खेळाडू भारतीय असणार आहेत.
Your talent, commitment, team spirit and kindness will f♾️rever resonate with us. 🫶
Though our journeys may part ways for now, our bond continues to remain strong. 💪
Thank you for the passion, the perseverance, and the unforgettable memories etched into our history! 🙌… pic.twitter.com/vpg14OCCSO
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 7, 2024
मिनी लिलावात खर्च करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे 3.25 कोटी रुपये आहेत. आता या पैशात चार भारतीय खेळाडूंना ताफ्यात घ्यायचं आहे. मुंबई इंडियन्सने पहिल्या पर्वात जेतेपद मिळवलं होतं. आरसीबीने मागच्या पर्वात जेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे आयपीएलच्या तिसऱ्या पर्वात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.