RCB Harshal patel: ‘आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत तू…’ बहिणीच्या निधनावर हर्षल पटेलची भावनिक पोस्ट
RCB Harshal patel: इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून (RCB) खेळणारा हर्षल पटेल (Harshal patel) सध्या दु:खामध्ये आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून (RCB) खेळणारा हर्षल पटेल (Harshal patel) सध्या दु:खामध्ये आहे. नुकतचं हर्षल पटेलच्या बहिणीचं निधन झालं. हर्षलची बहिण अर्चिता पटेलचं 9 एप्रिलला दु:खद निधन झालं. हर्षलच्या बहिणीचं निधन झालं म्हणून पुढच्याच सामन्यात RCB चा संघ दंडावर काळीपट्टी बांधून मैदानात उतरला होता. हर्षल काही दिवसांसाठी IPL चं बायो-बबल सोडून घरी सुद्धा जाऊन आला. हर्षल आता पुन्हा संघासोबत असून तो दमदार कामगिरी सुद्धा करतोय. हर्षलने बहिण अर्चिता पटेलसाठी सोशल मीडियावर एक भावनिक संदेश पोस्ट केला आहे. त्याने मेसेजसोबत बहिणीसोबतचा फोटोही पोस्ट केलाय. हर्षल पटेल आरसीबी संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. तो त्यांचा भरवाशाचा खेळाडू आहे.
‘या एका कारणामुळेच मी परत आलो’
“तू आमच्या आयुष्यातील एक आनंदी आणि दयाळू व्यक्ती होतीस. आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत चेहऱ्यावर हास्य ठेवून अनेक कठीण प्रसंगांना सामोरी गेलीस. भारतात येण्याआधी मी तुमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो. त्यावेळी तू माझी चिंता करु नकोस, खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला तू दिलास. या एकाच कारणामुळेच मी परत येऊन काल रात्री मैदानावर उतरु शकलो. तुझी आठवण आणि तुला सन्मान देण्यासाठी मी हे करु शकतो. तुला माझा अभिमान वाटेल, ते सर्व मी करत राहीन. आयुष्यात चांगली वेळ असो, वा वाईट मला नेहमीच तुझी आठवण येईल. मी तुझ्यावर भरपूर प्रेम करतो” अशी भावनिक पोस्ट हर्षलने लिहिली आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यानंतर समजलं
9 एप्रिलला RCB चा मुंबई इंडियन्स विरुद्ध सामना होता. आरसीबीने हा सामना सात विकेटने जिंकला. या सामन्यानंतरच हर्षल पटेलला बहिणीच्या निधनाची माहिती मिळाली. त्यानंतर तो तातडीने घरी गेला. परत आल्यानंतर 16 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सकडून सामनाही खेळला.
View this post on Instagram
हर्षलसाठी मोजले 10.75 कोटी
IPL 2022 मध्ये हर्षल पटेल आतापर्यंत पाच सामने खेळला असून त्यात त्याने सहा विकेट घेतल्या आहेत. हर्षलने मागच्या सीजनमध्ये आरसीबीसाठी खेळताना सर्वाधिक 32 विकेट घेतल्या आहेत. पर्पल कॅपही त्याने मिळवली होती. हर्षल पटेल मागच्या सीजनमध्येही आरसीबीसाठी खेळला होता. टीमने त्याला रिटेन केलं नव्हतं. मेगा ऑक्शनमध्ये आरसीबीने त्याला पुन्हा विकत घेतलं. हर्षल पटेलसाठी आरसीबीने 10.75 कोटींची बोली लावली होती.