IPL 2021: धोनीच्या चेन्नईसमोर विराटची आरसीबी ढासळली, उत्तम सुरुवातीनंतरही अखेर पराभूत, 6 विकेट्सनी सीएसके विजयी

चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु या दोन धुरंधर संघात झालेल्या सामन्यात अखेर धोनीचंच पारडं जड झालं. ज्यामुळे चेन्नईने सहा गडी राखून आरसीबीवर विजय मिळवला.

IPL 2021: धोनीच्या चेन्नईसमोर विराटची आरसीबी ढासळली, उत्तम सुरुवातीनंतरही अखेर पराभूत, 6 विकेट्सनी सीएसके विजयी
चेन्नईचा आरसीबीवर 6 गडी राखून विजय
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 11:29 PM

IPL 2021: विराट विरुद्ध धोनी या रंगतदार लढाईत अखेर धोनीचाच विजय झाला आहे. विराट कोहलीचा (Virat Kohli) संघ रॉयल चँलेजर्स बंगळुरुला (RCB)  महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्सने (CSK) 6 विकेट्सनी  मात देत विजय मिळवला आहे. एकाक्षणी चुरशीच्या स्थितीत असलेला सामना फिनिशर धोनी आणि रैना जोडीने सोप्या पद्धतीने जिंकत विजय चेन्नईच्या नावे केला आहे. सामन्यात विराटच्या आरसीबी संघाने उत्तम खेळाचे प्रदर्शन दाखवले खरे पण अखेऱ धोनीचीच चेन्नई भारी पडल्याने त्यांचा विजय झाला.

आरसीबीची दमदार सुरुवात, पण मोठा स्कोर नाहीच

सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी घेतल्याने आरसीबीने प्रथम फलंदाजी केली. ज्यामध्ये सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांनी सुरुवातीपासूनच फटेबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी आधी देवदत्तने आणि नंतर विराटने अर्धशतकाची नोंद केली. देवदत्तने 50 चेंडूत 70 धावा केल्या ज्यामध्ये त्याने 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर दुसरीकडे भारतीय कर्णधार विराटने देखील दमदार अर्धशतक लगावलं. त्याने 41 चेंडूत 53 धावा केल्या. या खेळीत विराटने 6 चौकार आणि एक षटकार ठोकला. पण त्या दोघानंतर एकाही खेळाडूला खास फलंदाजी करता आली नाही. डिव्हीलीयर्सने 12 आणि मॅक्सवेलने 11 धावा केल्या तर बाकी खेळाडूंना दुहेरी संख्याही गाठता न आल्याने आऱसीबी केवळ 157 धावाचं करु शकले.

चेन्नईची उत्तम फलंदाजी

चेन्नईला विजयासाठी 157 धावांचे आव्हान मिळाले असताना चेन्नईची तगडी फलंदाजी पाहता त्यांच्यासाठी हे अधिक अवघड नव्हते. त्यात पर्वाच्या सुरुवातीपासून चांगल्या फॉर्ममध्ये असणारे चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड (38) आणि फाफ डुप्लेसी (31) यांनी आजही उत्तम सुरुवात करुन दिली. ज्यानंतर मध्यल्या फळीत मोईन अली (23) आणि अंबाती रायडू (32) यांनी विजयाच्या जवळ संघाला नेऊन ठेवले. पण दोघेही बाद होताच आरसीबी कमबॅक करेल असे वाटत होते. त्याच क्षणी फिनिशर जोडी महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे नाबाद 11 आणि नाबाद 17 धावा करत संघाला सहा गडी राखून विजय मिळवून दिला.

चेन्नईचे गोलंदाज हुशार!

सुरुवातीला विराट आणि देवदत्तने धडाकेबाज फलंदाजी सुरु केली होती. त्यांनी 10 षटकातंच 90 च्या जवळ स्कोर नेऊन ठेवला. पण त्यानंतर मात्र चेन्नईच्या गोलंदाजानी टाईट गोलंदाजी करत आरसीबीला मोठा स्कोर कऱण्यापासून रोखलं यामध्ये शार्दूलने एका षटकात देवदत्त आणि एबी यांचे महत्त्वाचे विकेट घेतले. तर ब्राव्होने सर्वात भारी गोलंदाजी करत चार षटकांत 24 धावा देत तीन विकेट्स घेतल्या.

हे ही वाचा

RCB vs CSK: ‘सुपरमॅन’ कोहली, हवेत उडी घेत विराटने घेतलेली ही कॅच पाहाच!

AUSW vs INDW, 2nd ODI: नो बॉलवर कॅच झेलून जल्लोष, भारतीय महिलांचा मोठा पराभव, मालिकाही गमावली

IPL 2021 सुरु असतानाच सनरायजर्स हैद्राबाद संघात नवा खेळाडू दाखल, टी. नटराजनला कोरोनाची बाधा झाल्यामुळे बदल

(RCB vs CSK Live match Chennaki Superkings won game with 6 wickets Royal Challengers Bangalore lost the match)

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....