RCB vs CSK IPL 2022 Prediction Playing XI IPL 2022: बँगलोरला हरवण्यासाठी चेन्नई संघात करणार दोन बदल

सीएसकेने 9 पैकी फक्त तीन मॅच जिंकल्या आहेत. मुंबई आणि हैदराबाद संघाविरुद्ध त्यांनी दोन विजय मिळवलेत. सीएसकेला पहिला विजय बँगलोर विरुद्धच मिळाला होता.

RCB vs CSK IPL 2022 Prediction Playing XI IPL 2022: बँगलोरला हरवण्यासाठी चेन्नई संघात करणार दोन बदल
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 6:12 PM

मुंबई: पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर उद्या दोन मोठ्या संघांमध्ये सामना होणार आहे. एकाबाजूला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर तर दुसऱ्याबाजूला चेन्नई सुपर किंग्सचा संघ आहे. RCB चा संघ या सीजनमध्ये जास्त विजय मिळवून प्लेऑफच्या शर्यतीत आहे, तर CSK ची स्थिती खराब आहे. रवींद्र जाडेजाने (Ravindra jadeja) नेतृत्व सोडलं आहे. एमएस धोनी पुन्हा कॅप्टन झालाय. त्यामुळे संघाची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. बँगलोरने सलग सामने गमावलेत. त्यामुळे उद्याचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. उद्या दोन्ही टीम्स संघात कुठले बदल करतात? त्याची उत्सुक्ता आहे.

सीएसकेने 9 पैकी फक्त तीन मॅच जिंकल्या आहेत. मुंबई आणि हैदराबाद संघाविरुद्ध त्यांनी दोन विजय मिळवलेत. सीएसकेला पहिला विजय बँगलोर विरुद्धच मिळाला होता. बँगलोरच्या तुलनेत चेन्नईच्या संघाला सध्या सूर गवसला आहे.

बँगलोर बदल करण्याची शक्यता कमी

बँगलोरच्या टीमने या सीजनमध्ये जास्त बदल केलेले नाहीत. मागच्या तीन सामन्यात आरसीबीने खराब कामगिरी केलीय. पण तरीही बदल होण्याची शक्यता कमी आहे. संघाचा सूर हरवलेला आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या मागच्या सामन्यात विराट कोहली फॉर्मध्ये दिसला होता. रजत पाटीदार आणि महिपाल लोमरोडने आपली निवड योग्य ठरवली होती.

ड्वेन ब्राव्हो आणि शिवम दुबे मागच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळले नव्हते. उद्याच्या सामन्यात ते खेळतील. मिचेल सँटनर आणि समरजीत सिंहला बाहेर बसवलं जाईल.

बँगलोरची Playing 11 – फाफ डू प्लेसी (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, माहिपाल लोमरोड, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड आणि मोहम्मद सिराज

सीएसकेची Playing 11 – एमएस धोनी (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, डेवन कॉनवे, रॉबिन उथाप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी आणि महीश तीक्ष्णा,

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.