स्ट्राईक घेण्यास मॅक्सवेलचा नकार, षटकार ठोकून सामना जिंकवणाऱ्या केएस भरतने सांगितला लास्ट ओव्हरमधला थरार

आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या पर्वातील 56 वा सामना विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये पार पडला.

स्ट्राईक घेण्यास मॅक्सवेलचा नकार, षटकार ठोकून सामना जिंकवणाऱ्या केएस भरतने सांगितला लास्ट ओव्हरमधला थरार
KS Bharat -Glenn Maxwell
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 3:48 PM

दुबई : आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या पर्वातील 56 वा सामना विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये पार पडला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघानी अतिशय उत्तम खेळाचे दर्शन घडवले. अखेरच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या सामन्यात आरसीबीचा फलंदाज केएस भरत (K S Bharat) याने संघाला अखेरच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना षटकार ठोकत विजय मिळवून दिला. (RCB vs DC : KS Bharat, who won by hitting six, told the story of last over, Maxwell refused to take the strike)

आरसीबी आणि दिल्ली हे दोघेही याआधीच प्लेऑफमध्ये गेले असल्याने शुक्रवारची लढत स्पर्धेच्या दृष्टीने औपचारिक होती. पण दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याने लढत चुरशीची झाली. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 164 धावा केल्या. 165 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आरसीबीलाही संपूर्ण 20 षटकं खेळावी लागली, पण अखेर लक्ष्य पूर्ण करत आरसीबीने विजय मिळवला.

मॅक्सवेलने भरतवर विश्वास दाखवला

भरतला विचारण्यात आले की शेवटच्या षटकापूर्वी तुझ्यात आणि मॅक्सवेलमध्ये काय चर्चा झाली? त्यावर भरतने सांगितले की, मॅक्सवेलने त्याचा आत्मविश्वास वाढवला. मुंबई इंडियन्सविरुद्ध 32 आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध 44 धावांची उपयुक्त खेळी खेळणाऱ्या भरतने सामन्यानंतर सांगितले की, “शेवटच्या षटकात मॅक्सी आणि मी बोललो की, आपण कुठे शॉट्स खेळू शकतो. तो म्हणाला चेंडू बघ आणि जोरदार फटका मार. शेवटचे तीन चेंडू बाकी असताना मी त्याला विचारले की, एक धाव घेऊ का, तर त्याने सांगितले की, तूच मोठा फटका खेळून सामना जिंकवू शकतोस. त्यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला.”

अखेरच्या षटकात भरतने जबादारी घेतली

भरत म्हणाला की, त्याला शेवटच्या षटकापूर्वी जास्त विचार करायचा नव्हता. तो म्हणाला, ‘मी अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी एका वेळी एका चेंडूवर लक्ष केंद्रित करत होतो. मी गोष्टी सोप्या ठेवल्या. आम्ही एक संघ म्हणून चांगली कामगिरी केली आणि जिंकलो. तो म्हणाला, आमच्या संघातील प्रत्येकजण त्यांच्या आव्हानासाठी सज्ज आहे. मला मला नाही वाटत की, आमच्यात कोणत्याही प्रकारचं मिसकम्युनिकेशन आहे. आमच्यातील प्रत्येक जण चांगलं प्रदर्शन करुन संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय.

दिल्लीची दमदार सलामी

सामन्यात नाणेफेक जिंकत आरसीबीने गोलंदाजी निवडली. त्यामुळे फलंदाजी दिल्लीकडे गेली. ज्याचा दिल्लीच्या सलामीवीरांनी संपूर्ण फायदा उचलला. दिल्लीची हीट जोडी पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दमदार फलंदाजी केली. सलामीवीर शिखरने 43 आणि पृथ्वीने 48 धावा केल्या. ज्यामुळे दिल्लीला एक चांगली सुरुवात मिळाली. ज्यानंतर शिमरॉन हीटमायरच्या 29 धावांच्या जोरावर दिल्लीने 164 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून सिराजने 2 आणि चहल, पटेलसह ख्रिस्टीयनने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

भरत-मॅक्सवेल जोडीची भागिदारी आणि आरसीबी विजयी

विजयासाठी 165 धावा करण्याकरता मैदानात आलेल्या आरसीबीचे सलामीवीर विराट आणि देवदत्त लगेच बाद झाले. एबीही 29 धावा करुन तंबूत परतला. पण त्यानंतर मैदानात आलेल्या केएस भरत आणि ग्ले मॅक्सवेल जोडीने अखेरच्या चेंडूपर्यंत लढत देत संघाला विजय मिळवून दिला. भरतने नाबाद 78 आणि मॅक्सेवेलने नाबाद 51 धावांची तुफानी खेळी केली. विशेष म्हणजे अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना आरसीबीच्या केेएस भरत याने षटकार ठोकत संघाला 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला.

इतर बातम्या

IPL 2021: इशान-सूर्यकुमारच्या धुवांधार फलंदाजीने रेकॉर्ड्सचा पाऊस, एकाच सामन्यात रचले अनेक विक्रम

IPL 2021 : 5 वेळा विजयी, मग यंदा प्ले ऑफमध्ये एन्ट्री का नाही?, रोहित शर्मा म्हणतो, ‘कुणीच दोषी नाही फक्त…’

T20 World Cup : जोर न लावताच भारत पाकिस्तानला नमवेल, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूकडून संघाची कानउघडणी

(RCB vs DC : KS Bharat, who won by hitting six, told the story of last over, Maxwell refused to take the strike)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.