RCB vs DC Live Score, IPL 2021: केएस भरत चमकला, अखेरच्या चेंडूवर षटकार, दिल्लीला 7 विकेट्सनी दिली मात

| Updated on: Oct 08, 2021 | 11:23 PM

RCB vs DC Live Score in Marathi: चेन्नईपाठोपाठ प्लेऑफमध्ये पोहोचलेले दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आज केवळ औपचारिकता म्हणून एकमेंकाविरुद्ध सामना खेळतील.

RCB vs DC Live Score, IPL 2021: केएस भरत चमकला, अखेरच्या चेंडूवर षटकार, दिल्लीला 7 विकेट्सनी दिली मात
दिल्ली विरुद्ध आरसीबी सामन्यातील एक क्षण

आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील 56 वा सामना विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर पार पडला. आरसीबी आणि दिल्ली हे दोघेही याआधीच प्लेऑफमध्ये गेले असल्याने आजची लढत स्पर्धेच्या दृष्टीने औपचारिक होता. पण दोन्ही संघ यंदा फॉर्ममध्ये असल्याने सामना चुरशीची झाला.

सामन्यात नाणेफेक जिंकत विराटने गोलंदाजी निवडली. त्यामुळे दिल्लीचे खेळाडू प्रथम फलंदाजीला आले. दरम्यान सलामीवीर पृथ्वी आणि शिखर यांनी अप्रतिम सुरुवात करुन देत अनुक्रमे 48 आणि 43 धावा झळकावल्या. ज्यानंतरच्या खेळाडूंना मात्र खास कामगिरी करता आली नाही. केवळ शिमरॉन हीटमायरने 29 धावांच्या जोरावर दिल्लीला 164 धावांपर्यंत पोहोचवलं. विजयासाठी 165 धावा करण्याकरता मैदानात आलेल्या आरसीबचे सलामीवीर लगेच बाद झाले. एबीही 29 धावा करुन तंबूत परतला पण केएस भरत (नाबाद 78) आणि मॅक्सेवेल (नाबाद 51) यांनी तुफानी खेळी करत संघाला 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Oct 2021 11:12 PM (IST)

    RCB vs DC: अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत आरसीबी विजयी

    अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना आरसीबीच्या केेएस भरत याने षटकार ठोकत संघाला 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला आहे.

  • 08 Oct 2021 10:51 PM (IST)

    RCB vs DC: मॅक्सवेल आणि भरतने सांभाळला डाव

    एबी बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने केएस भरतसोबत मिळून डाव सांभाळला आहे. आता अखेरच्या 3 षटकात आरसीबीला 31 धावांची गरज आहे.

  • 08 Oct 2021 10:02 PM (IST)

    RCB vs DC: कर्णधार विराट बाद

    आरसीबी संघाची सुरुवात खराब झाली असून दोन्ही सलामीवीर देवदत्त आणि विराट हे नॉर्खियाच्या चेंडूवर बाद झाले आहेत.

  • 08 Oct 2021 09:20 PM (IST)

    RCB vs DC: दिल्लीची 164 धावांपर्यंत मजल

    सलामीवीर शिखर (43) आणि पृथ्वी (48) यांच्या धमाकेदार सुरुवातीच्या जोरावर दिल्लीने 164 धावा बनवल्या आहेत. त्यामुळे आरसीबीला विजयासाठी 165 धावांची गरज आहे.

  • 08 Oct 2021 09:04 PM (IST)

    RCB vs DC: श्रेयस अय्यर तंबूत परत

    दिल्लीचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर 18 धावा करुन बाद झाला आहे. सिराजच्या बोलिंगवर डॅनियलने त्याची कॅच घेतली आहे.

  • 08 Oct 2021 08:31 PM (IST)

    RCB vs DC: पृथ्वीचं अर्धशतकही थोडक्यात हुकलं, 48 धावांवर बाद

    सलामीवीर शिखर बाद होताच काही वेळातच सलामीवीर पृथ्वी शॉही बाद झाला आहे. 48 धावा करुन शॉ बाद झाला असून चहलच्या चेंडूवर जियॉर्जी गार्टनने त्याची कॅच घेतली.

  • 08 Oct 2021 08:20 PM (IST)

    RCB vs DC: शिखरचं अर्धशतक हुकलं

    दिल्लीला उत्तम सुरुवात करुन दिल्यानंतर शिखर धवन आरसीबीच्या हर्षल पटेलच्या चेंडूवर बाद झाला आहे. धवन 43 धावा करुन बाद झाला आहे.

  • 08 Oct 2021 08:17 PM (IST)

    RCB vs DC: दिल्लीची मजबूत सुरुवात

    दिल्लीचे सलामीवीर शिखर आणि पृथ्वी यांनी संघाला उत्तम सुरुवात करुन दिली आहे. 10 ओव्हरनंतर एकही विकेट न गमावता दिल्लीचा स्कोर 88 आहे.

  • 08 Oct 2021 07:33 PM (IST)

    RCB vs DC: दिल्लीचे सलामीवीर मैदानात

    आरसीबीने प्रथम गोलंदाजी निवडल्याने दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ मैदानात आले आहेत.

  • 08 Oct 2021 07:06 PM (IST)

    DC अंतिम 11

    पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), शिमरॉन हिटमायर, रीपल पटेल, अक्षर पटेल, आर आश्विन, कागिसो रबाडा, ए. नॉर्खिया, आवेश खान

  • 08 Oct 2021 07:05 PM (IST)

    RCB अंतिम 11

    विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, केएस भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलीयर्स, डॅनियल ख्रिस्टीयन, शाहबाज अहमद, जियॉर्जी गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.

  • 08 Oct 2021 07:03 PM (IST)

    दिल्लीकडे प्रथम फलंदाजी

    सामन्यात नाणेफेक जिंकत आरसीबीचा कर्णधार विराटने गोलंदाजी निवडली आहे. त्यामुळे दिल्लीचे फलंदाज प्रथम फलंदाजीसाठी येतील.

Published On - Oct 08,2021 7:02 PM

Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.