Sophie Devine | अरेरे! सोफी डेव्हाईनचं शतक एका धावेने हुकलं पण RCB ला जिंकवलं
वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील 16 व्या सामना हा आरसीबी विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात सोफी डेव्हाईन हीन तडाखेदार बॅटिंग करत कारनामा केला.
मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धा 2023 मध्ये रॉयल चँलेंजर्सची सुरुवात अत्यंत वाईट झाली. आरसीबीला सलग 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर आरसीबीने जोरदार कमबॅक करत सलग 2 सामन्यात विजय मिळवण्याची कामगिरी केली आहे. आरसीबीने 15 मार्चला यूपीला पराभूत केल्यानंतर आज 18 मार्च रोजी गुजरात जायंट्सचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. गुजरातने विजयासाठी दिलेल्या 189 धावांचं आव्हान आरसीबीने 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. सोफी डेव्हाईन ही आरसीबीच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिने आधी बॉलिंग करताना 1 विकेट घेतली. तर नंतर बॅटिंगने धमाका केला.
सोफीने या सामन्यात वादळी खेळी केली. सोफीने 99 धावांवर होती. शतकासाठी अवघ्या 1 धावेची गरज होती. मात्र घात झाला. सोफीने 99 धावांवर आऊट झाली आणि 1 धावेने शतक हुकलं. यामुळे मैदानात एकच शांतता पसरली आणि आरबीसी चाहत्यांचा हिरमोड झाला. सोफीने शतक पूर्ण केलं असतं तर ती या स्पर्धेच्या इतिहासातील पहिलं शतक ठोकणारी फलंदाज ठरली असती. मात्र तसं झालं नाही. पण तिने केलेल्या या खेळीमुळे आरसीबीचा विजय सहज आणि सोपा झाला.
सोफीने या खेळीत चौफेर फटेकबाजी केली. मैदनातील प्रत्येक कोपऱ्यात फटके मारले. गुजरातच्या एकाह गोलंदाजाला तिने सोडलं नाही. तिने या खेळीत 9 चौकार आणि 8 कडकडीत सिक्स ठोकले. या खेळीदरम्यान तिचा स्ट्राईक रेट हा 275.00 इतका होता.
सोफी डेव्हाईन धमाकेदार खेळी
WHAT. AN. INNINGS. ?
The whole stadium applauds! We are in disbelief but Sophie has to depart. ?#PlayBold #ನಮ್ಮRCB #SheIsBold #WPL2023 #RCBvGG pic.twitter.com/JRWFztHO1i
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 18, 2023
त्याआधी गुजरातने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 4 आऊट 188 धावा केल्या. गुजरातकडून लॉरा वोल्वार्ड हीने 68, अॅशलेग गार्डनर 41, सभिनेनी मेघना 31, हेमलथा आणि सोफिया डंकले या दोघींनी प्रत्येकी 16* आणि हर्लीन देओल ही नाबाद 12 रन्स केल्या. आरसीबीकडून श्रेयांका पाटील हीने 2 विकेट्स घेतल्या.तर सोफी डेव्हाईन आणि प्रीती बोस हीने 1-1 विकेट घेतली.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन | स्मृती मंधाना (कॅप्टन), सोफी डेव्हाईन, एलिस पेरी, हीदर नाइट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, दिशा कासट, मेगन शुट, आशा शोबाना आणि प्रीती बोस.
गुजरात जायंट्स | स्नेह राणा (कर्णधार), सोफिया डंकले, लॉरा वोल्वार्ड, हरलीन देओल, अॅशलेग गार्डनर, दयालन हेमलता, सभिनेनी मेघना, सुषमा वर्मा (wk), किम गर्थ, तनुजा कंवर आणि अश्विनी कुमारी.