RCB vs KKR IPL 2022 Match Prediction: RCB पराभवातून उसळी घेईल? आज श्रेयसच्या KKR शी भिडणार

RCB vs KKR IPL 2022 Match Prediction: IPL 2022 मध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना होणार आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर ही लढत रंगणार आहे.

RCB vs KKR IPL 2022 Match Prediction: RCB पराभवातून उसळी घेईल?  आज श्रेयसच्या KKR शी भिडणार
आजचा सामना RCB वि केकेआर Image Credit source: RCB & KKR
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 7:00 AM

मुंबई: IPL 2022 मध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना होणार आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर ही लढत रंगणार आहे. KKR आणि RCB चा हा दुसरा सामना आहे. कोलकाता नाइट रायडर्सने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला होता, तर आरसीबीचा पहिल्या सामन्यात पंजाबने पराभव केला होता. कोलकाता आजचा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम टिकवण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्याबाजूला केकेआर विरुद्धचा सामना जिंकून RCB विजयाचं खात उघडण्यासाठी प्रयत्नशील असेल. सलामीच्या सामन्यात RCB ने 205 धावांचा डोंगर उभा केला, तरी त्यांना पराभव पहावा लागला. पंजाब किंग्सच्या ओडियन स्मिथने त्यांचा विजयाचा घास हिरावला. आठ चेंडूत 25 धावांची स्फोटक खेळी त्याने केली. त्याने जागेवरुन खडे-खडे षटकार ठोकले.

गोलंदाजीचं काय करणार?

आरसीबी बद्दल बोलायचं झाल्यास त्यांचा कॅप्टन फाफ डु प्लेसी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने पंजाब किंग्स विरुद्ध 57 चेंडूतन 88 धावा ठोकल्या. दिनेश कार्तिक आणि विराट कोहलीने सुद्धा चांगली फटकेबाजी केली. गोलंदाजी मात्र त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. गोलंदाजीमध्ये त्यांची कमकुवत बाजू दिसून आली. मोहम्मद सिराज दोन विकेट घेतल्यानंतरही महागडा गोलंदाज ठरला. चार षटकात त्याने 59 धावा दिल्या. त्याशिवाय क्षेत्ररक्षणही ढिसाळ झालं. मोक्याच्या क्षणी आरसीबीच्या फिल्डर्सनी झेल सोडले.

RCB वि KKR हेड टू हेड रेकॉर्ड

केकेआरसाठी पहिल्या सामन्यात सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या. सलामीला येत अजिंक्य रहाणेने चांगली सुरुवात करुन दिली. उमेश यादवने देखील पावरप्लेच्या षटकात दोन विकेट काढल्या. आरसीबी आणि केकेआरमध्ये आतापर्यंत 29 सामने झालेत. यात 13 सामने आरसीबीने आणि 16 सामने केकेआरने जिंकले आहेत. आरसीबी विरुद्ध केकेआरचा सर्वोच्च स्कोर 222 धावा आहे. तेच आरसीबीने केकेआर विरुद्ध 213 धावांची मोठी खेळी केली आहे.

सुपरफिट फलंदाज विरुद्ध खतरनाक बॉलर्स

RCB कडे विराट कोहलीच्या रुपात धोकादायक फलंदाज आहे, तर केकेआरकडे सुनील नरेन सारखा गोलंदाज आहे. फाफ डु प्लेसी KKR चा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचा सामना कसा करतो?, केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराजमधील लढत याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

अशी असू शकते RCB ची Playing 11

फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), अनुज रावत, विराट कोहली, शेरफॅनी रुदरफोर्ड, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, आकाशी दीप, डेविड विली, हर्षल पटेल, शहाबाज अहमद, मोहम्मद सिराज

अशी असू शकते KKR ची Playing 11

वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कॅप्टन), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नरेन, शेल्डन जॅक्सन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, टिम साऊदी,

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.