RCB vs LSG 2023 : Virat Kohli ने ‘त्या’ 10 चेंडूंमध्ये RCB च्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली? सायमन डूलकडून प्रश्नचिन्ह

RCB vs LSG IPL 2023 : विराट कोहली लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध जबरदस्त खेळला. पण त्याने काय चूक केली?. विराट आणि अन्य फलंदाजांच्या बॅटिंगमध्ये काय अंतर होतं? त्यामुळे विराट कोहलीच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे.

RCB vs LSG 2023 : Virat Kohli ने 'त्या' 10 चेंडूंमध्ये RCB च्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली? सायमन डूलकडून  प्रश्नचिन्ह
Virat kohliImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 8:23 AM

RCB vs LSG IPL 2023 : आयपीएलच्या 15 व्या मॅचमध्ये लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर रोमांचक विजय मिळवला. बँगलोरने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौच्या टीमने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. सामन्यादरम्यान विराट कोहलीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. RCB च्या या बॅट्समनवर न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज आणि प्रसिद्ध कॉमेंटेटर सायमन डूलने प्रश्नचिन्ह उपस्थित केलय.

सायमन डूलने विराट कोहलीच्या अर्धशतकीय इनिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. कोहलीने 44 चेंडूत 61 धावा फटकावल्या. डूल विराटच्या या इनिंगवर नाखूश आहे. विराट कोहलीने आपलं अर्धशतक झळकवण्यासाठी जास्त वेळ घेतला, असं डूलच मत आहे. टी 20 क्रिकेटमध्ये ही चांगली बाब नाही, असं डूल म्हणतो.

विराट कोहली कुठे चुकला?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध विराट कोहलीने आक्रमक सुरुवात केली होती. त्याने 25 चेंडूत 42 धावा फटकावल्या होत्या. पण अर्धशतकाच्या जवळ पोहोचताना त्याच्या फलंदाजीची गती मंदावली. विराटने पुढच्या 8 धावा काढण्यासाठी 10 चेंडू घेतले. डूलच्या मते, टी 20 क्रिकेटमध्ये इतका वेळ घेतल्यामुळे टीमच नुकसान होतं.

विराट पेक्षा दुसरे फलंदाज फास्ट

विराट कोहलीबद्दल बोलायच झाल्यास, त्याचा स्ट्राइक रेट 138.64 चा आहे. हा स्ट्राइक रेट चांगलाय. पण चिन्नास्वामीची पीच लक्षात घेता, हा स्ट्राइक रेट कमीच वाटतो. विराट कोहलीचा सहकारी डुप्लेसीने 171 च्या स्ट्राइक रेटने 79 धावा फटकावल्या. मॅक्सवेलने 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 59 धावा केल्या.

पूरनने कितीच्या स्ट्राइक रेटने धावा केल्या?

प्रतिस्पर्धी टीमच्या निकोलस पूरनने 300 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फटकेबाजी केली. त्याने 62 धावा ठोकल्या. स्टॉयनिसचा स्ट्राइक रेट 200 पेक्षा जास्त होता. हे आकडे पाहता, विराटच्या बॅटिंगवर प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. डूलने याआधी कोणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलय?

सायमन डुलने याआधी पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजमच्या स्ट्राइक रेटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मोहम्मद रिजवानच्या स्ट्राइक रेटबद्दलही तो बोललाय. खेळाडूंनी आपल्या आकड्यांपेक्षा टीम हिताचा जास्त विचार केला पाहिजे, असं डूलच म्हणणं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.