Mumbai Indians वरील विजयानंतर RCB च्या ड्रेसिंग रुममध्ये विराट कोहलीसोबत काय घडलं? VIDEO

RCB vs MI : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने मुंबई इंडियन्स विरुद्ध 8 विकेटने जोरदार विजय मिळवला. या विजयाच RCB च्या ड्रेसिंग रुममध्ये जोरदार सेलिब्रेशन झालं.एवढ्या मोठ्या विजयाच ड्रेसिंग रुममध्ये जोरदार सेलिब्रेशन होणं स्वाभाविक आहे.

Mumbai Indians वरील विजयानंतर RCB च्या ड्रेसिंग रुममध्ये विराट कोहलीसोबत काय घडलं? VIDEO
RCB Virat kohliImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 3:32 PM

MI vs RCB IPL 2023 : विराट कोहलीने रविवारी रात्री धुवाधार बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून फोर-सिक्सचा पाऊस पडला. मुंबईच्या कुठल्याही बॉलरला विराट कोहलीने दया-माया दाखवली नाही. जोफ्रा आर्चरच्या बॉलिंगचा प्रतिस्पर्धी टीमवर एक धाक असतो. पण कोहलीने त्याला सुद्धा आपलं विराट रुप दाखवलं. विराट कोहलीसोबत कॅप्टन डुप्लेसीने सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली. डुप्लेसीने 73 धावा केल्या. कोहलीने नाबाद 82 धावा फटकावल्या. आरसीबीने विजयासह खात उघडलय. सहाजिकच एवढ्या मोठ्या विजयाच ड्रेसिंग रुममध्ये जोरदार सेलिब्रेशन होणं स्वाभाविक आहे.

आरसीबीच्या विजयानंतर सेलिब्रेशनमध्ये विराट कोहली आणि कॅप्टन फाफ डुप्लेसी खूपच उत्साहात दिसले. दोघांमध्ये एक उत्तम बॉन्डिंग दिसून आली. आरसीबीच्या अँथमवर सगळेच खेळाडू सेलिब्रेशन करत होते. त्याचवेळी डुप्लेसीने एक कृती केली, ज्याने सगळ्याच फॅन्सच लक्ष वेधून घेतलं. डुप्लेसीने विराट कोहलीला मागून पकडल आणि उचललं.

विराट-डुप्लेसीची मैत्री मैदानात दिसली

विराट कोहली आणि डुप्लेसीची खरी मैत्री मैदानात दिसली. दोन्ही अनुभवी फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच कंबरड मोडून ठेवलं. डुप्लेसी आणि विराट दोघेही आक्रमक अंदाजात खेळले. बेहरडॉर्फ असो वा जोफ्रा आर्चर, विराट-डुप्लेसीने सर्वांचा समाचार घेतला.

172 धावांच्या मुंबईच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट-डुप्लेसीने 148 धावांची भागीदारी केली. या एका भागीदारीमुळे आरसीबीने 24 चेंडू राखून विजय मिळवला. 3 सीजननंतर चिन्नास्वामीवर RCB फॅन्ससमोर खेळणाऱ्या कोहलीने प्रेक्षकांना निराश केलं नाही. RCB च्या माजी कर्णधाराने 38 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. कोहली शेवटपर्यंत क्रीजवर टीकून होता. 17 व्या ओव्हरमध्ये सिक्स मारुन त्याने टीमला विजय मिळवून दिला. विजयात सातत्य ठेवावं लागेल

आरसीबीसाठी सीजनची सुरुवात दमदार झालीय. आरसीबीला आपल्या कामगिरीत सातत्य ठेवाव लागेल. बँगलोरचा पुढचा सामना केकेआर विरुद्ध आहे. 6 एप्रिलला ही मॅच होईल. पीच बँगलोरपेक्षा वेगळा असेल. त्यावेळी डुप्लेसी आणि विराट कशी बॅटिंग करतात, यावर लक्ष असेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.