RCB vs PBKS IPL 2022: आई गं, रजतचा 102 मीटर लांबलचक SIX आजोबांच्या डोक्यावर आदळला, पहा VIDEO

RCB vs PBKS IPL 2022: पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दरम्यान झालेल्या सामन्यावेळी हेच पहायला मिळालं. RCB च्या डावा दरम्यान हे घडलं. या घटनेने खूप वर्षापूर्वीची सौरव गांगुली बाबतची एक आठवण ताजी झाली.

RCB vs PBKS IPL 2022: आई गं, रजतचा 102 मीटर लांबलचक SIX आजोबांच्या डोक्यावर आदळला, पहा VIDEO
Rajat Patidar Image Credit source: PTI/Twitter
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 10:20 AM

मुंबई: क्रिकेटच्या मैदानात फलंदाजाचे मोठे फटके नेहमीच एक वेगळा आनंद देतात. बॅट्समनने SIX मारल्यानंतर चाहत्यांचा स्टेडियममध्ये जल्लोष सुरु होतो. पण काही वेळा षटकार एखाद्यासाठी काळ बनतो. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एखाद्याला गंभीर दुखापत होते. 13 मे रोजी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दरम्यान झालेल्या सामन्यावेळी हेच पहायला मिळालं. RCB च्या डावा दरम्यान हे घडलं. या घटनेने खूप वर्षापूर्वीची सौरव गांगुली बाबतची एक आठवण ताजी झाली. बँगलोरच्या रजत पाटीदारने (Rajat Patidar) लांबलचक षटकार खेचला. पण त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आजोबांच्या डोक्यावर जाऊन हा बॉल आदळला. बँगलोरच्या इनिंगमध्ये 9 व्या षटकात हे घडलं. पंजाबचा हरप्रीत बराड गोलंदाजी करत होता. त्या षटकातील चौथ्या चेंडूवर रजत पाटीदारने लांबलचक सिक्स मारला. त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेला एका वृद्ध माणसाला दुखापत झाली.

ती वृद्ध व्यक्ती विव्हळताना दिसली

चेंडूला डोक्याला लागल्यानंतर ती वृद्ध व्यक्ती विव्हळताना दिसली. त्यांना वेदन सहन होत नव्हत्या. त्यांच्या जवळ बसलेले नातलग त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते. सुदैवाने त्या वृद्धाचं डोकं फुटलं नाही.

हे सुद्धा वाचा

20 वर्षांपूर्वी गांगुलीने असाच षटकार खेचला होता

भारतीय फलंदाजाच्या बॅट मधून निघालेल्या षटकाराने चाहता घायाळ होण्याची ही पहिली घटना नाहीय. याआधी ऑगस्ट 2002 मध्ये सुद्धा अस झालय. हेडिंग्ले टेस्टच्या दुसऱ्यादिवशी गांगुलीने षटकार ठोकला होता. एका वृद्ध व्यक्तीच्या डोक्यावर सिक्स मारलेला चेंडू आदळला होता. त्यावेळी त्या वृद्धाचं बॉल लागल्याने डोक फुटलं होतं. सौरव गांगुलीने त्या सामन्यात 128 धावा केल्या होत्या. भारताने तो सामना एक डाव आणि 46 धावांनी जिंकला होता.

पाटीदारने बनवल्या 26 धावा

कालच्या पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात रजत पाटीदारने 21 चेंडूत 26 धावा फटकावल्या. 54 धावांनी बँगलोरचा पराभव झाला. IPL मध्ये ही 15 वी वेळ आहे, जेव्हा आरसीबीचा 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी पराभव झालाय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.