RCB vs PBKS Live Score, IPL 2021 : चहलच्या फिरकीची कमाल, आरसीबीचा पंजाबवर 6 धावांनी विजय

| Updated on: Oct 03, 2021 | 7:32 PM

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आजच्या दिवसातील पहिला सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Banglore) यांच्यात खेळवला जात आहे.

RCB vs PBKS Live Score, IPL 2021 : चहलच्या फिरकीची कमाल, आरसीबीचा पंजाबवर 6 धावांनी विजय
RCB vs PBKS

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आज सुपर संडे आहे. आजच्या दिवसात दोन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Banglore) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडीक्कलने तो निर्णय सार्थ ठरवला. पडीक्कल आणि विराट कोहलीने संघाला 68 धावांची सलामी दिली. विराट कोहली 25 धावांवर बाद झाल्यानंतर पडीक्कलने धावफलक हलता ठेवला.

40 धावा करुन तोदेखील बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने (57) अर्धशतकी खेळी करत बँगलोरला दीडशतकी मजल मारुन दिली. एबी डिव्हिलियर्सने 23 धावांचं योगदान दिलं. पंजाबच्या गोलंदाजांनी या सामन्यात बरी गोलंदाजी केली. पंजाबकडून मोजेस हेनरिक्सने 4 षटकात अवघ्या 12 धावा देत 3 बळी घेतले. तर मोहम्मद शमीने 4 षटकात 39 धावा देत 3 बळी घेतली. शमीने तिन्ही बळी अखेरच्या षटकात मिळवले. दरम्यान आरसीबीने दिलेले 166 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी पंजाबचे फलंदाज मैदानात उतरले. दरम्यान पंजाबची सुरुवात उत्तम झाली. सलामीवीर मयांक (57) आणि राहुल (39) यांच्यानंतर एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता न आल्याने अखेर पंजाबचा संघ 6 धावांनी पराभूत झाला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 03 Oct 2021 07:20 PM (IST)

    अवघ्या 6 धावांनी पंजाब विजयी

    अखेरच्या षटकात पंजाबला 19 धावांची गरज होती. पण पंजाबचे फलंदाज 12 धावाच करु शकल्याने अखेर 6 धावांनी आरसीबीचा संघ विजयी झाला आहे.

  • 03 Oct 2021 07:12 PM (IST)

    एका षटकात 19 धावांची गरज

    पंजाबला अखेरच्या षटकात तब्बल 19 धावांची गरज आहे.

  • 03 Oct 2021 07:02 PM (IST)

    मार्करमही बाद

    पंजाबचा पाचवा गडीही बाद झाला आहे. मार्करमची विकेट जियॉर्ज गार्टनने घेतली आहे.

  • 03 Oct 2021 06:55 PM (IST)

    चहलला तिसरं यश

    मयांकला बाद केल्यानंतर लगेचच चहलने सरफराज खानलाही बाद केलं आहे. आता पंजाबला विजयासाठी 4 षटकात 44 धावांची गरज आहे.

  • 03 Oct 2021 06:54 PM (IST)

    पंजाबच्या अडचणीत वाढ

    आधीच कमी चेंडूत अधिक धावांची गरज असलेल्या पंजाब संघाला आणखी एक झटका बसला आहे. चांगल्या लयी असलेला मयांक अगरवालला चहलने बाद केलं आहे.

  • 03 Oct 2021 06:36 PM (IST)

    निकोलस पूरन बाद

    पंजाबचा दुसरा गडीही तंबूत परतला आहे. चहलच्या चेंडूवर पडीक्कलने पूरनची कॅच घेत त्याला माघारी धाडलं आहे.

  • 03 Oct 2021 06:35 PM (IST)

    मयांकचं अर्धशतक पूर्ण

    पंजाबचा सलामीवीर मयांक अगरवालने संघाला उत्तम सुरुवात करुन देत स्वत:च अर्धशतकही पूर्ण केलं आहे. 36 चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केलं आहे.

  • 03 Oct 2021 06:28 PM (IST)

    केएल राहुल बाद

    मयांकसोबत मिळून संघाला दमदार सुरुवात करुन देणारा केएल राहुल अखेर 39 धावा करुन बाद झाला आहे. शहबाज अहमदच्या चेंडूवर हर्षल पटेलने त्याची कॅच घेतली आहे.

  • 03 Oct 2021 06:17 PM (IST)

    पंजाबची दमदार सुरुवात

    पंजाब संघाने दमदार सुरुवात केली असून 70 धावा झाल्यातरी एकही सलामीवीर बाद झालेला नाही. 69 चेंडूत 95 धावांची गरज पंजाबला आहे.

  • 03 Oct 2021 05:44 PM (IST)

    पंजाबचे सलामीवीर मैदानात

    प्रथम फलंदाजी करत आरसीबीने 165 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे 166 धावा करण्यासाठी पंजाबचे सलामीवीर केएल राहुल आणि मयांक अगरवाल मैदानात उतरला आहे.

  • 03 Oct 2021 05:18 PM (IST)

    बँगलोरला 7 वा धक्का George Garton शून्यावर बाद

    मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात तिसरी विकेट घेतली आहे. त्याने George Garton ला शून्यावर त्रिफळाचित केलं.

  • 03 Oct 2021 05:14 PM (IST)

    बँगलोरला 6 वा धक्का, शहबाज अहमद 8 धावांवर बाद

    मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात अजून एक विकेट मिळवली आहे. त्याने शहबाज अहमदला 8 धावांवर असताना बाद त्रिफळाचित केलं. (बँगलोर 165/6)

  • 03 Oct 2021 05:07 PM (IST)

    बँगलोरला 5 वा धक्का ग्लेन मॅक्सवेल 57 धावांवर बाद

    मोहम्मद शमीने 20 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बँगलोरला मोठा धक्का दिला. त्याने ग्लेन मॅक्सवेलला 57 धावांवर असताना सरफराज खानकरवी झेलबाद केलं.

  • 03 Oct 2021 05:02 PM (IST)

    बँगलोरला चौथा झटका, एबी डिव्हिलियर्स 23 धावांवर बाद

    सरफराज खानने एबी डिव्हिलियर्सला 23 धावांवर धावबाद केलं. (बँगलोर 146/4)

  • 03 Oct 2021 05:00 PM (IST)

    मॅक्सवेलचं अर्धशतक

    ग्लेन मॅक्सवेलने 29 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने अर्धशतक फटकावलं.

  • 03 Oct 2021 04:31 PM (IST)

    बँगलोरचा तिसरा झटका, पडीक्कल 40 धावांवर बाद

    बँगलोरने तिसरी विकेट गमावली आहे. मोजेस हेनरिके याने देवदत्त पडीक्कलला 40 धावांवर असताना के. एल. राहुलकरवी झेलबाद केलं. (बँगलोर 73/3)

  • 03 Oct 2021 04:20 PM (IST)

    मोजेस हेनरिक्सचा हल्लाबोल, एकाच षटकात विराट कोहली-डॅन ख्रिश्चन बाद

    10 व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या मोजेस हेनरिक्सने बँगलोरला लागोपाठ दोन धक्के दिले आहेत. षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने विराट कोहलीला (25) बाद केल, तर त्याच्या पुढच्या चेंडूवर त्याने डॅन ख्रिश्चनचा (00) बळी घेतला.

  • 03 Oct 2021 03:57 PM (IST)

    पडीक्कलचा षटकार, बँगलोरचं अर्धशतक

    6 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर देवदत्त पडीक्कलने शानदार षटकार ठोकला, तसेच या षटकातील चौथ्या चेंडूवर पडीक्कलने एकेरी धाव घेत बँगलोरचं अर्धशतक पूर्ण केलं.

  • 03 Oct 2021 03:30 PM (IST)

    पंजाब किंग्सच्या संघात तीन बदल, RCB मध्ये नो चेंज

    शारजाहमध्ये आजच्या सामन्यासाठी, जिथे पंजाब किंग्सने त्यांच्या संघात 3 बदल केले आहेत. त्याच वेळी, आरसीबीने त्याच प्लेइंग इलेव्हनसह मैदानात प्रवेश केला आहे. पंजाब किंग्सने हरप्रीत ब्रार, सरफराज खान आणि मोझेस हेनरिक्सच्या जागी फॅबियन एलन, दीपक हुडा आणि नॅथन एलिस यांना संघात स्थान दिलं आहे.

  • 03 Oct 2021 03:27 PM (IST)

    नाणेफेक जिंकून बँगलोरचा फलंदाजी करण्याचा निर्णय

    रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published On - Oct 03,2021 3:25 PM

Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.