RCB vs PBKS, IPL 2022: 10.75 कोटीचा खेळाडू अशी बालिश चूक करणार, तर RCB मॅच कशी जिंकणार?

RCB vs PBKS, IPL 2022: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) स्पर्धेतील तिसरा सामना काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्समध्ये (RCB vs PBKS) खेळला गेला.

RCB vs PBKS, IPL 2022: 10.75 कोटीचा खेळाडू अशी बालिश चूक करणार, तर RCB मॅच कशी जिंकणार?
आरसीबी वि किंग्स इलेव्हन पंजाब Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 3:38 PM

मुंबई: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) स्पर्धेतील तिसरा सामना काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्समध्ये (RCB vs PBKS) खेळला गेला. पंजाबने या सामन्यात बँगलोरवर पाच गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना RCB ने 205 धावांचा डोंगर उभा केला, तरीही त्यांचा पराभव झाला. पंजाब किंग्सने 19 व्या षटकातच 206 धावांचे विशाल लक्ष्य पार केलं. ओडीन स्मिथ पंजाब किंग्सच्या विजयाचा हिरो ठरला. ओडीन स्मिथने आठ चेंडूत नाबाद 25 धावांची खेळी करुन बँगलोरची विजयाची संधी हिरावली. ओडीन स्मिथने आपल्या डावात तीन षटकार आणि एक चौकार लगावला. त्याचा स्ट्राइक रेट 300 पेक्षा जास्त होता. ओडीन स्मिथशिवाय शिखर धवन 29 चेंडूत 43 धावा, भानुका राजपक्षाने 22 चेंडूत 43 धावांची खेळी केली. अखेरपर्यंत शाहरुख खान खेळपट्टीवर होता. त्याने नाबाद 24 धावा केल्या. आरसीबीने मोठी धावसंख्या उभारुनही हा सामना गमावला. आरसीबीने हा सामना गमावण्यामागचं कारण वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) सांगितलं.

कॅच सोडण्यावर बोलणं योग्य नाही

या सामन्यात मोक्याच्या क्षणी अनुज रावतने ओडीन स्मिथचा सोपा झेल सोडला. 17 व्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर अनुज रावतने ऑलराऊंडर ओडीन स्मिथचा सोपा झेल सोडला. त्यावेळी स्मिथ फक्त 2 धावांवर खेळत होता. ओडीन स्मिथने त्यानंतर तीन षटकार आणि एक चौकार लगावून सामनाचा फिरवला. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या मते, अनुज रावतने कॅच सोडली असली, तरी पराभवासाठी तो जबाबदार नाहीय. सेहवागच्या मते हर्षल पटेलने ओडिन स्मिथला रनआऊट करण्याची संधी सोडली, तेच पराभवाचे मुख्य कारण आहे. “अनुज रावतच्या कॅच सोडण्यावर बोलणं योग्य नाहीय. कारण झेल सुटत असतात. मी ड्रेसिंग रुममध्येही त्यावर बोलणार नाही. पण हर्षल पटेलने जो रनआऊट सोडला, त्यावर चर्चा जरुर करीन” असं सेहवाग म्हणाला. हर्षल पटेलला RCB ने ऑक्शनमध्ये 10.75 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे.

हर्षल पटेल फक्त एक सेकंद थांबला आणि…

हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर ओडीन स्मिथचा झेल सुटला, त्यानंतर पंजाबच्या ऑलराऊंडरला आणखी एक जीवदान मिळालं. हर्षल पटेलने ओडीन स्मिथला रनआऊट करण्याची सोपी संधी वाया दवडली. 17 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शाहरुख खानने फटका खेळला. चेंडू सरळ कव्हर्समध्ये उभ्या असलेल्या फिल्डरच्या हातात गेला. त्यावेळी नॉन स्ट्राइक एन्डवर उभा असलेला ओडीन स्मिथ खूप पुढे निघून गेला होता.

ती एक ओव्हर महागडी ठरली

फिल्डरने हर्षल पटेलकडे चेंडू थ्रो केला. हर्षल पटेलने चेंडू पक़डला पण त्याने स्टंम्पवर चेंडू फेकला नाही. हर्षल पटेल एक सेकंद थांबला. पण त्यामुळे ओडीन स्मिथला जीवदान मिळाले. पुढच्याच षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर त्याने एक ओव्हरमध्ये 25 धावा कुटल्या. त्यामुळे पंजाबने एक ओव्हर राखून सामना जिंकला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.