RCB vs RR IPL 2022: संतप्त हर्षल पटेलने एक्स्ट्रा बॉलवर घेतली महत्त्वाची विकेट, विराटचा जबरदस्त झेल पहा VIDEO
RCB vs RR IPL 2022: आयपीएलच्या (IPL) 15 व्या सीजनमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (RCB vs RR) सामना सुरु आहे. ही 13 वी लढत आहे.
मुंबई: आयपीएलच्या (IPL) 15 व्या सीजनमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (RCB vs RR) सामना सुरु आहे. ही 13 वी लढत आहे. दोन्ही टीम्सच्या नावात ‘रॉयल’ आहे. त्यामुळे खरा ‘रॉयल‘ कोण? हे सिद्ध करण्यासाठी सामना सुरु आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर RCB चा कॅप्टन फाफ डु प्लेसिसने (Faf du plesis) क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गोलंदाजांनीही त्याला निराश केलं नाही. मोहम्मद सिराज आणि डेविड विली या दोघांनी नव्या चेंडूने सुंदर गोलंदाजी केली. राजस्थानचा संघ तिसऱ्या-चौथ्या षटकापासून फटकेबाजी सुरु करतो. पण सिराज-विली जोडीने अचूक टप्प्यावर चेंडू टाकून त्यांना जखडून ठेवलं. डेविड विलीने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालला क्लीन बोल्ड केलं.
आकाश दीपची साथ
आकाश दीपने सुद्धा या दोघांना चांगली साथ दिली. त्याने सुद्धा शिस्तबद्ध गोलंदाजी करुन जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल या राजस्थानच्या फलंदाजांना मुक्तपणे फटकेबाजी करु दिली नाही. पावर प्लेच्या पहिल्या सहा षटकात राजस्थानच्या फक्त एक बाद 35 धावा झाल्या होत्या.
असे चेंडू टाकण्यात हर्षल पटेल मास्टर
पावरप्लेनंतर प़डिक्कल-बटलर जोडीने काही चौकार-षटकार मारले. कॅप्टनने डू प्लेसिसने नंतर हर्षल पटेलला गोलंदाजीला आणलं. त्याने कॅप्टनला निराश केलं नाही. वेगवान आणि स्लोव्हर वन चेंडूंच मिश्रण करुन फलंदाजाच्या अडचणी वाढवण्यात हर्षल पटेल मास्टर आहे. आज सुद्धा त्याने तशीच गोलंदाजी केली. मागच्या सीजनमध्ये हर्षल पटेलने सर्वाधिक 32 विकेट घेतल्या होत्या.
Extra ball becomes a blessing for #HarshalPatel and #RCB #DevduttPadikkal is caught by Kohli pic.twitter.com/2shROzuhI9
— Raj (@Raj93465898) April 5, 2022
शेवटच्या चेंडूवर फसवलं
हर्षल पटेलने आज गरज असताना देवदत्त पडिक्कल आणि जोस बटलरची जोडी फोडली. बटलरने मुंबई इंडियन्स विरोधात शतकी खेळी साकारली होती, तर देवदत्तने SRH विरुद्ध 42 धावांची आक्रमक खेळी केली होती. त्यामुळे ही जोडी फोडणं आवश्यक होतं. हर्षलने देवदत्त पडिक्कलला शेवटच्या चेंडूवर फसवलं. यात इंटरेस्टिग भाग म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे अतिरिक्त चेंडूवर देवदत्त पडिक्कल आऊट झाला. देवदत्त पडिक्कलला हर्षलने स्लोअर बाऊन्सर टाकला. ऑन फिल्ड अंपायरने तो चेंडू वाईड ठरवला. हा निर्णय हर्षल पटेलला पटला नाही. त्याच्या चेहऱ्यावर संतप्त भाव होते. अखेर त्याने टाकलेला षटकातील शेवटचा चेंडू फटकावताना देवदत्तने मारलेला फटका विराटने झेलला. विराटने ही जबरदस्त कॅच घेतली.