RCB vs RR Highlights, IPL 2022: राजस्थानचा RCB वर 29 धावांनी ‘रॉयल’ विजय, पॉइंटस टेबलमध्ये टॉपवर

| Updated on: Apr 27, 2022 | 12:01 AM

Royal challengers Banglore vs Rajasthan Royals Live Score in Marathi: आयपीएल पॉइंटस टेबलमध्ये राजस्थान तिसऱ्या आणि बँगलोर पाचव्या स्थानावर आहे.

RCB vs RR Highlights, IPL 2022: राजस्थानचा RCB वर 29 धावांनी 'रॉयल' विजय, पॉइंटस टेबलमध्ये टॉपवर
RCB vs RR

मुंबई: राजस्थान रॉयल्सने आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर (RR vs RCB) 29 धावांनी विजय मिळवला. राजस्थानने आजचा सामना जिंकून या सीजनमधील मागच्या पराभवाचा हिशोब चुकता केला. राजस्थानची फलंदाजी आज अपेक्षेनुसार झाली नाही. 20 षटकात त्यांना फक्त 144 धावाच करता आल्या. रियान परागमुळे (Riyan parag) राजस्थानला लढण्याइतपत धावसंख्या उभारता आली. RCB ला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले होते. T-20 क्रिकेटच्या दृष्टीने ही फार मोठी धावसंख्या नाहीय. पण राजस्थानच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करुन आरसीबीला विजयपासून वंचित ठेवलं. राजस्थानच्या 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB चा डाव 115 धावात आटोपला. RCB चा संघ रथी-महारथी स्टार खेळाडूंनी भरलेला आहे. वास्तविक त्यांच्यासाठी हे खूप सोपं लक्ष्य होतं. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

अशी आहे RCB ची playing 11 फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभूदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, वानिंन्दु हसरंगा, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज

अशी आहे राजस्थानची playing 11 संजू सॅमसन (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, डॅरील मिचेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल,

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 26 Apr 2022 11:16 PM (IST)

    राजस्थानचा RCB वर 29 धावांनी ‘रॉयल’ विजय

    राजस्थानने RCB वर 29 धावांनी ‘रॉयल’ विजय मिळवला. पॉइंटस टेबलमध्ये राजस्थानचा संघ टॉपवर पोहोचला आहे. राजस्थानच्या 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB चा डाव 115 धावात आटोपला.

  • 26 Apr 2022 11:05 PM (IST)

    RCB पराभवाच्या उंबरठ्यावर, आठ विकेट गेल्या

    RCB पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. त्यांच्या आठ विकेट गेल्या आहेत. 17 षटकात आठ बाद 103 धावा झाल्या आहेत. 18 चेंडूत 42 धावांची आवश्यकता.

  • 26 Apr 2022 10:51 PM (IST)

    RCB ला 30 चेंडूत विजयासाठी 55 धावांची आवश्यकता

    15 षटकात आरसीबीच्या सहा बाद 90 धावा झाल्या आहेत. 30 चेंडूत विजयासाठी 55 धावांची आवश्यकता आहे. हसरंगा आणि शाहबाजची जोडी मैदानात आहे.

  • 26 Apr 2022 10:38 PM (IST)

    दिनेश कार्तिक रनआऊट

    RCB चा डाव आणखी अडचणीत सापडला आहे. दिनेश कार्तिक 6 धावांवर रनआऊट झाला. प्रसिद्ध कृष्णाने केलेल्या थ्रो वर चहलने रनआऊट केलं.

  • 26 Apr 2022 10:30 PM (IST)

    RCB ला पाचवा झटका

    RCB ला पाचवा झटका बसला आहे. सुयश प्रभूदेसाई 2 धावांवर आऊट झाला. 11.4 षटकात 66/5 अशी RCB ची स्थिती आहे.

  • 26 Apr 2022 10:20 PM (IST)

    10 षटकात RCB च्या चार बाद 58 धावा, अश्विनने दिला झटका

    10 षटकात RCB च्या चार बाद 58 धावा झाल्या आहेत. अश्विनने 16 धावांवर खेळणाऱ्या रजत पाटीदारला क्लीन बोल्ड केलं.

  • 26 Apr 2022 09:48 PM (IST)

    विराट कोहली स्वस्तात बाद

    सलामीला आलेला विराट कोहली स्वस्तात बाद झाला. त्याने 9 धावा केल्या. फाफ डू प्लेसीस आणि रजत पाटीदारची जोडी मैदानात आहे. चार ओव्हर्समध्ये एक बाद 22 धावा झाल्या आहेत.

  • 26 Apr 2022 09:18 PM (IST)

    रियान परागची हाफ सेंच्युरी

    राजस्थान रॉयल्सकडून रियान परागने आज दमदार फलंदाजी केली. त्याने कठीण परिस्थितीत 31 चेंडूत 56 धावा केल्या. त्याने तीन चौकार आणि चार षटकार ठोकले. त्याच्या अर्धशतकामुळे राजस्थानला 20 षटकात आठ बाद 144 धावा करता आल्या.

  • 26 Apr 2022 08:52 PM (IST)

    शिमरॉन हेटमायरला हसरंगाने गुंडाळलं

    बिग हिटर शिमरॉन हेटमायरला हसरंगाने गुंडाळलं. हेटमायरने प्रभूदेसाईकडे झेल दिला. त्याने तीन धावा केल्या. 16 षटकात राजस्थानच्या सहा बाद 104 धावा झाल्या आहेत.

  • 26 Apr 2022 08:43 PM (IST)

    राजस्थानचा डाव अडचणीत, निम्मा संघ परतला तंबूत

    राजस्थानचा डाव अडचणीत. निम्मा संघ तंबूत परतला आहे. डॅरिल मिचेल 16 धावांवर आऊट झाला. हेझलवूडच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलने सीमारेषेवर झेल घेतला. 14.2 षटकात पाच बाद 99 धावा झाल्या आहेत.

  • 26 Apr 2022 08:37 PM (IST)

    राजस्थानच्या चार बाद 95 धावा

    13 षटकात राजस्थानच्या चार बाद 95 धावा झाल्या आहेत. डॅरिल मिचेल 14 आणि रियान पराग 20 धावांवर खेळतोय.

  • 26 Apr 2022 08:22 PM (IST)

    राजस्थान रॉयल्सची चौथी विकेट

    राजस्थान रॉयल्सची चौथी विकेट गेली आहे. कॅप्टन संजू सॅमसनला हसरंगाने 27 धावांवर बोल्ड केलं. 9.4 षटकात चार बाद 68 अशी राजस्थानची स्थिती आहे.

  • 26 Apr 2022 08:12 PM (IST)

    आठ षटकात राजस्थानच्या तीन बाद 65

    आठ षटकात राजस्थानच्या तीन बाद 65 धावा झाल्या आहेत. जोस बटलर आज लवकर आऊट झाला. त्याने आठ धावा केल्या. रविचंद्रन अश्विनही तंबूत परतला आहे. संजू सॅमसन 26 धावांवर खेळतोय.

  • 26 Apr 2022 07:49 PM (IST)

    वकील गुणरत्न सदावर्ते Live

    नारायण राणे राज्य सरकारला सूड उगावू नका म्हणाले माझ्या बाजुने बोलले

    त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो

    माझी फडणवीस आणि अमित शाह यांची चुकीच्या तपासात हस्तक्षेप करावा अशी विनंती करतो

    अनेक ठिकाणी माझ्यासाठी यज्ज्ञ करण्यात आले

    अनेकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली

  • 26 Apr 2022 07:47 PM (IST)

    बटलर-अश्विनची जोडी मैदानात

    तीन षटकात राजस्थानच्या एक बाद 25 धावा झाल्या आहेत. बटलर 8 आणि अश्विन 9 धावांवर खेळतोय.

  • 26 Apr 2022 07:42 PM (IST)

    पहिल्या चेंडूवर SIX चौथ्या बॉलवर सिराजने काढली देवदत्तची विकेट

    मोहम्मद सिराजने राजस्थान रॉयल्सला पहिला झटका दिला आहे. दुसरी ओव्हर टाकणाऱ्या सिराजने पहिल्या बॉलवर सिक्स खाल्ला. चौथ्या चेंडूवर त्याने देवदत्त पडिक्कलला पायचीत पकडलं. त्याने सात धावा केल्या. राजस्थानच्या एक बाद 19 धावा झाल्या आहेत.

  • 26 Apr 2022 07:34 PM (IST)

    राजस्थानच्या डावाला सुरुवात

    RCB ने आज फिरकी गोलंदाजाकरवी सुरुवात केली. शाहबाज अहमदने पहिली ओव्हर टाकली. पहिल्या ओव्हरमध्ये राजस्थानच्या बिनबाद 5 धावा झाल्या आहेत.

  • 26 Apr 2022 07:26 PM (IST)

    RCB ने टीममध्ये केला एक बदल

    RCB ने आज टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बँगलोरने आज संघात एक बदल केला आहे. ओपनर अनुज रावतच्या जागी रजत पाटीदारला संधी दिली आहे.

  • 26 Apr 2022 07:18 PM (IST)

    अशी आहे राजस्थानची playing 11

    संजू सॅमसन (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, डॅरील मिचेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल,

  • 26 Apr 2022 07:16 PM (IST)

    अशी आहे RCB ची playing 11

    फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभूदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, वानिंन्दु हसरंगा, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज

Published On - Apr 26,2022 7:14 PM

Follow us
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.