World cup Final मध्ये केएल राहुलच शतक ते गोलंदाजीत नको तो बदल ‘या’ 5 चूका टीम इंडियाला महाग पडल्या
IND vs AUS World Cup Final | World cup Final मध्ये टीम इंडियाचा काल पराभव झाला. समोर ऑस्ट्रेलियाचा संघ होता. खरंतर ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत टीम इंडियाची बाजू वरचढ होती. आपण वर्ल्ड कपमध्ये सलग 10 सामने जिंकले होते. पण अखेरच्या महत्वाच्या सामन्यात कामगिरी उंचावण्यात कमी पडलो. फायनलमध्ये टीम इंडियाला या पाच चूका महाग पडल्या.
IND vs AUS World Cup Final | वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकले होते. त्यामुळे वर्ल्ड कप विजेतेपदासाठी त्यांनाच प्रबळ दावेदार मानल जात होतं. पण फायनलमध्ये वेगळ चित्र दिसलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा मुकाबला रंगला होता. ऑस्ट्रेलियाने फायनलनमध्ये टीम इंडियावर 6 विकेटने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 240 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 42 चेंडू आणि 6 विकेट राखून विजय मिळवला. आता प्रश्न हा आहे की, सलग 10 सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाच फायनलमध्ये नेमकं चुकल काय? चूक कुठे झाली?
रोहित शर्माने वर्ल्ड कप 2023 मध्ये 597 धावा केल्या. पण फायनलमध्ये त्याने एक चूक केली. टीम इंडियाच्या पराभवासाठी ते सुद्धा एक कारण आहे. रोहित शर्माने चांगली सुरुवात केल्यानंतर आपली विकेट फेकली. रोहितने 31 चेंडूत 47 धावा केल्या होत्या. पण खराब शॉट खेळून विकेट गमावला.
पराभवाच दुसरं कारण
विराट कोहली सेट झाल्यानंतर आऊट झाला हे सुद्धा पराभवाच एक मुख्य कारण आहे. विराट कोहलीने फायनलमध्ये 63 चेंडूत 54 धावा केल्या. पण तो ज्या क्षणाला बाद झाला, तिथून टीम इंडियाची घसरण सुरु झाली. विराटचा विकेट 29 व्या ओव्हरमध्ये गेला. म्हणजे अजून 21 ओव्हरचा खेळ बाकी होता. विराटने एकेरी-दुहेरी धावा पळून काढल्या. पण चौकार-षटकार मारण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर दबाव आणला नाही.
केएल राहुलच शतक भारी पडलं
केएल राहुलने काल वर्ल्ड कप फायनलमध्ये उलट शतक झळकावलं. त्याने धावांऐवजी चेंडूच शतक केलं. 107 चेंडू खेळून त्याने 66 धावा केल्या. यात फक्त एक चौकार होता. राहुल डॉट बॉल खूप जास्त खेळला. त्यामुळे सुद्धा टीम इंडियाची धावगती मंदावली. अन्यथा आणखी 30-40 धावा होऊ शकल्या असत्या.
40 ओव्हरमध्ये फक्त इतके चौकार
वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने फक्त 16 बाऊंड्री मारल्या. यात 12 बाऊंड्री पहिल्या 10 ओव्हरमध्ये आल्या होत्या. म्हणजे नंतरच्या 40 ओव्हरमध्ये फक्त 4 चौकार मारले. भारताची मधली फळी पूर्णपणे अपयशी ठरली. केएल राहुलचा स्ट्राइक रेट 61 तर जाडेजाचा स्ट्राइक रेट 40 चा होता. सूर्यकुमार यादवचा स्ट्राइक रेट 64 चा होता.
रणनितीमध्ये एक मोठी चूक
वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाने आपल्या गोलंदाजीच्या रणनितीमध्ये बदल केला. नव्या चेंडूने जसप्रीत बुमराहसोबत मोहम्मद शमीला गोलंदाजी दिली. मागच्या 10 सामन्यात बुमराह सोबत सिराजने ओपनिंग स्पेल टाकला होता. शमीने फायनलमध्ये टीम इंडियाला एक विकेट मिळवून दिला. पण त्याची गोलंदाजीची दिशा भरकटली होती. त्याचे चेंडू जरा जास्त स्विंग झाले आणि कंट्रोल गमावून बसले. मोहम्मद सिराजचा पाचवा गोलंदाज म्हणून वापर केला.