World cup Final 2023 | नशीब ऑस्ट्रेलियासोबत का? कारण त्यांना लकी ठरणारा ‘हा’ अंपायर असेल मैदानावर

World cup Final 2023 | ऑस्ट्रेलियन टीमने जेव्हा, जेव्हा वर्ल्ड कप फायनल जिंकली, तेव्हा हाच अंपायर होता मैदानात. महत्त्वाच म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या मॅचमध्ये हाच अंपायर मैदानावर असतो. प्रत्येक नॉकआऊट सामन्यात या अंपयारने टीम इंडियाची पाठ काढलीय. त्यामुळे लक फॅक्टर ऑस्ट्रेलियाच्या बाजूला झुकलेलं आहे.

World cup Final 2023 | नशीब ऑस्ट्रेलियासोबत का? कारण त्यांना लकी ठरणारा 'हा' अंपायर असेल मैदानावर
Ind vs Aus World cup 2023 Final
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 1:32 PM

अहमदाबाद : अपना लक पहनकर चलो ही एका जाहीरातीली टॅगलाइन आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन टीम लक घालून उतरणार नाही. पण लक सोबत घेऊन नक्कीच मैदानात उतरेल. म्हणजेच टीम इंडियासाठी फायनलच आव्हान सोप नसेल. रोहित शर्मा अँड कंपनीच चॅलेंज वाढवणार ऑस्ट्रेलियाच हे लक कुठलं?. ऑस्ट्रेलियाला यामुळे काय फायदा होईल? या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याआधी वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये अंपायरच जे पॅनल असेल, त्याबद्दल जाणून घ्या.

वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये रिचर्ड कॅटलबरो आणि रिचर्ड इलिंगवर्थ फील्ड अंपायर असतील. जॉय विल्सन थर्ड अंपायरच्या भूमिकेत असतील. क्रिस्टोफर जाफने थर्ड अंपायर असतील. एंडी पायक्रॉफ्ट मॅच रेफरी असतील. तुम्ही म्हणाल अंपायरच्या या पॅनलच ऑस्ट्रेलियाच्या लकशी काय देणं-घेणं?. कनेक्शन आहे, कसं ते जाणून घ्या?

ऑस्ट्रेलियाने तो-तो सामना जिंकलाय

रिचर्ड कॅटलबरो वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये फिल्ड अंपायर असतील. कॅटलबरो हे ऑस्ट्रेलियासाठी लकी ठरले आहेत. ICC टुर्नामेंटमध्ये ज्या कुठल्या मोठ्या मॅचमध्ये कॅटलबरो अंपायर होते. ऑस्ट्रेलियाने तो सामना जिंकलाय. 2015 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलपासून 2023 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल पर्यंत हेच होत आलय.

प्रत्येकवेळी तोच अंपायर होता

2015 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये रिचर्ड कॅटलबरो अंपायर होते. त्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवलेलं. त्यानंतर त्याच वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कॅटलबरोच अंपायर होते. त्यावेळी सुद्धा ऑस्ट्रेलियन टीम चॅम्पियन बनली. ऑस्ट्रेलियाने 2021 मध्ये टी 20 वर्ल्ड कप फायनलचा किताब जिंकला. त्यावेळी सुद्धा रिचर्ड कॅटलबरोच अंपायर होते. इतकच नाही, परवा ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेमीफायनलचा सामना 3 विकेटने जिंकला, त्यावेळी सुद्धा रिचर्ड कॅटलबरोच अंपायर होते.

टीम इंडियाच्या महत्त्वाच्या सामन्यात हाच अंपायर असतो

आता वर्ल्ड कप 2023 ची फायनल आहे. रिचर्ड कॅटलबरो या मॅचमध्येही फील्ड अंपायर आहेत. आता फक्त पहायच हे आहे की, ऑस्ट्रेलियासाठी लक फॅक्टर पुन्हा एकदा तसच काम करणार का?. सध्याच्या घडीला तरी टीम इंडिया तुफानसारखी भासतेय. हे तुफान रोखणं सोप नाहीय. फक्त टीम इंडियाला आपल्या परफॉर्मन्सने ऑस्ट्रेलियाच हे लक फॅक्टर निष्प्रभ कराव लागेल. मागच्या 9 वर्षात टीम इंडियाने जे नॉकआऊट सामने हरलेत, त्यात रिचर्ड कॅटलबरोच अंपायर होते.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....