चेतेश्वर पुजारावर भडकलेला Rishabh Pant, अजिंक्य रहाणेने सांगितलं ड्रेसिंग रुममध्ये काय घडलेलं?

टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh pant) एक आक्रमक क्रिकेटपटू आहे. पण व्यक्ती म्हणून तो खूपच शांत स्वभावाचा आहे.

चेतेश्वर पुजारावर भडकलेला Rishabh Pant, अजिंक्य रहाणेने सांगितलं ड्रेसिंग रुममध्ये काय घडलेलं?
rishabh-pant
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 1:08 PM

मुंबई: टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh pant) एक आक्रमक क्रिकेटपटू आहे. पण व्यक्ती म्हणून तो खूपच शांत स्वभावाचा आहे. 2020-21 मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) दरम्यान या डावखुऱ्या फलंदाजाचा संयम सुटला होता. एका कार्यक्रमात स्वत: ऋषभनेच या बद्दल खुलासा केला. तो संघातील सीनियर खेळाडू चेतेश्वर पुजारावर (Cheteshwar pujara) भडकला होता. आपल्या सहकाऱ्यावरच ऋषभ कसा नाराज झाला होता, ते अजिंक्य रहाणेने सांगितलं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सिडनी कसोटीतील ही घटना होती. या सामन्यात ऋषभ पंतच शतक अवघ्या 3 रन्सने हुकलं होतं. 97 धावांवर तो आऊट झाला होता. आपल्या बाद होण्यासाठी त्याने चेतेश्वर पुजाराला जबाबदार धरल होतं. त्या कसोटीत पुजाराने असं काय केलं होत की, ऋषभ शतक झळकवू शकला नव्हता.

‘बंदो मे था दम’

सिडनी कसोटीतील दुसऱ्याडावातील ही गोष्ट आहे. भारताला 407 धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारतीय सलामीवीर चांगल्या सुरुवातीनंतर आऊट झाले होते. त्या सामन्यात कॅप्टन असलेला अजिंक्य रहाणे सुद्धा लवकर बाद झाला होता. त्यानंतर पंत आणि पुजाराने खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाज केली. दोघांनी 148 धावांची भागीदारी केली. पंत दुसऱ्याडावात 97 धावांवर आऊट झाला. नॅथन लायनने त्याचा विकेट घेतला. आऊट झाल्यानंतर ऋषभ प्रचंड भडकला होता. वूटची डॉक्युमेंट्री सीरीज ‘बंदो मे था दम’ मध्ये पंतने त्या मागचं कारण सांगितलं.

मी दुहेरी मानसिकतेमध्ये गेलो

“पुजाराने मला क्रीजवर टिकून रहाण्याचा सल्ला दिला होता. तू एकेर-दुहेरी धावा पळू शकतोस. चौकार मारण्याची आवश्यकता नाही, असं त्याने सांगितलं होतं. पुजाराच्या त्या सल्ल्यानंतर मी दुहेरी मानसिकतेमध्ये गेलो. मला काय करायचं आहे, त्या बद्दल माझा प्लान नेहमी स्पष्ट असतो. आऊट झाल्यानंतर मी विचार केला, हे काय झालं. मी त्या कसोटीत शतक ठोकलं असतं, तर माझ्या करीयरमधील ते सर्वोत्तम शतक ठरल असतं” असं पंत म्हणाला.

तो काही बोलला नसता, तर मी शतकही ठोकलं असतं

ड्रेसिंग रुममध्ये पाऊल ठेवल्यानंतर ऋषभ पंत प्रचंड रागामध्ये होता, असं अजिंक्य रहाणेने सांगितलं. पुजाराने त्याला सांगितलं, “तू 97 रन्सवर आहेस, चांगला खेळतोयस. तू असाच खेळत राहिलास, तर शतक होईल. तो खरंतर पंतचा उत्साह वाढवत होता. पण ऋषभ आऊट झाला” असं अजिंक्यने सांगितलं. “पंत ड्रेसिंग रुममध्ये आला, तेव्हा तो रागात होता. पुजाराने मला मी 97 रन्सवर खेळतोय, याची आठवण करुन दिली. मला तर हे माहितही नव्हतं. जर तो काही बोलला नसता, तर मी शतकही ठोकलं असतं” असं ऋषभ बोलून गेल्याच अजिंक्य रहाणे म्हणाला. पुजारा त्या सामन्यात 205 चेंडू खेळला व 77 धावांवर आऊट झाला. हा तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला. भारताने हा कसोटी सामना 2-1 ने जिंकला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.