Rishabh Pant Health Update : ऋषभ पंतवर ‘या’ देशात होणार ऑपरेशन!

Rishabh Pant Health Update : किती महिने क्रिकेटपासून राहणार दूर? सध्या ऋषभला डेहारडूनहून मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

Rishabh Pant Health Update : ऋषभ पंतवर 'या' देशात होणार ऑपरेशन!
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 7:35 AM

मुंबई: टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला डेहराडूनहून मुंबईला हलवण्यात आलं आहे. 30 डिसेंबरला दिल्लीहून रुडकी येथे जात असताना ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. सुदैवाने ऋषभ या अपघातातून बचावला. पण तो गंभीर जखमी झाला आहे. ऋषभवर डेहराडूनच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. आता भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने पुढील उपचारासाठी त्याला मुंबईला हलवलं आहे. या अपघातात पंतच्या गुडघ्याला मार लागला आहे. याच शस्त्रक्रियेसाठी त्याला लंडनला पाठवलं जाण्याची दाट शक्यता आहे. या ऑपरेशनमधून पूर्णपणे सावरण्यासाठी त्याला जवळपास 9 महिने लागू शकतात.

….म्हणून BCCI ने पंतला मुंबईत हलवलं

रस्ते अपघातात पंतच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना दुखापत झाली आहे. यात कुठलीही दुखापत गंभीर नाहीय, ज्यामुळे त्याच्या जीवाला किंवा करिअरला धोका निर्माण होईल. पण पंत मैदानात लवकर परतण्याची शक्यता कमी आहे. त्याला गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचं लिगामेंट फाटलं आहे. लिगामेंटला झालेली दुखापत कितपत गंभीर आहे, ते जाणून घेण्यासाठी BCCI ने बुधवारी 4 जानेवारीला विशेष एअर अॅम्ब्युलन्सने त्याला मुंबईत आणलं.

‘या’ देशात होणार सर्जरी

मुंबईत ऋषभच MRI स्कॅन केलं जाईल. त्यातून लिगामेट टीयरला कितपत मार लागलाय ते लक्षात येईल. ऋषभ लवकर मैदानात परतणार नाही, हे तितकच स्पष्ट आहे. पंतला सर्जरीसाठी लंडनला पाठवण्यात येईल. प्रवासासाठी तो योग्य आहे, असं डॉक्टरांना वाटेल, तेव्हा सर्जरीसाठी त्याला पाठवलं जाईल. बरं होण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, हे आम्ही सांगू शकत नाही. इनसाइड स्पोर्ट्सने बीसीसीआय सूत्राच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया होणार

पंतच्या दोन्ही गुडघ्यांवर सर्जरी केली जाईल. त्यामुळे त्याला 9 महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाव लागू शकतं. एकदा सूज कमी झाली की, “डॉक्टर पार्दिवाला आणि त्यांची टीम पुढच्या उपचाराची दिशा ठरवेल” असं बीसीसीआयमधील सूत्राने सांगितलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.