Rishabh Pant: अखेर ‘ती’ व्यक्ती रुग्णालयात येऊन ऋषभला भेटली, अपघातानंतर आतुरतेने पाहत होता वाट

Rishabh Pant: कोण आहे ती व्यक्ती? ज्याची ऋषभ इतकी आतुरतेने रुग्णालयात वाट पाहत होता.

Rishabh Pant: अखेर 'ती' व्यक्ती रुग्णालयात येऊन ऋषभला भेटली, अपघातानंतर आतुरतेने पाहत होता वाट
rishabh pantImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 2:47 PM

डेहराडून: ऋषभ पंत सध्या डेहराडूनच्या रुग्णालयात आहे. 30 डिसेंबरला ऋषभच्या कारला भीषण अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला. ऋषभची कार डिवायडरला धडकून पलटली. ऋषभच्या कारला आग लागली. पण ऋषभ कसाबसा कारच्या बाहेर पडला. ऋषभ रुग्णालयात आहे. अनेक जवळच्या लोकांनी रुग्णालयात येऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. पण ऋषभ दोन व्यक्तींची आतुरतेने वाट पाहत होता, ज्यांना तो आयुष्यात कधीही विसरणार नाही. हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर रजत कुमार आणि त्याच्यासोबत असलेल्या कंडक्टर या त्या दोन व्यक्ती आहेत.

सर्वप्रथम पंतची मदत केली

हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर आणि कंडक्टर ऋषभला भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते. पंत सुद्धा या दोघांची वाट पाहत होता. अपघातानंतर ऋषभला त्या दोघांना भेटायचं होतं. हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर रजत कुमारने सर्वप्रथम पंतची मदत केली. त्याने वेळीच पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे पंतवर उपचार शक्य झाले.

कोणी मदतीसाठी पुढे आलं नाही, तेव्हा…..

ऋषभ पंत आणि रजत कुमार यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये पंतची आई सुद्धा दिसते. पंतचा चेहरा दिसत नाहीय. पण रिपोर्ट्सनुसार, पंत त्या दोघांना भेटून आनंदी होता. मदतीसाठी त्याने आभार मानले. ऋषभ पंतच्या गाडीला आग लागली. त्यावेळी अनेक गाड्या तिथून गेल्या. पण कोणी मदतीसाठी पुढे आलं नाही. त्यावेळी हरयाणा रोडवेजचा ड्रायव्हर रजत कुमार मदतीसाठी पुढे आला. कशी आहे पंतची तब्येत?

ऋषभ पंतच्या तब्येतीत सातत्याने सुधारणा होतेय. आयसीयूमधून त्याला प्रायव्हेट सूटमध्ये हलवण्यात आलय. दोन-तीन दिवसात पंतला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. पण मैदानावर पुनरागमनासाठी त्याला वेळ लागेल. पायाला झालेली दुखापत बरी व्हायला वेळ लागेल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.