IND vs ENG, 2nd T20: ऋषभ पंत ओपनिंगला येणार, इशान किशन पाणी देणार? एजबॅस्टन मध्ये मोठ्या बदलाचे संकेत
IND vs ENG, 2nd T20: पहिल्या टी 20 सामन्यात 50 धावांनी एकतर्फी विजय मिळवल्यानंतर टीम इंडियासमोर आता एजबॅस्टनच आव्हान आहे. हे तेच मैदान आहे, जिथे टीम इंडियाचा पाचव्या कसोटी सामन्यात पराभव झाला व कसोटी मालिका विजयाची संधी निसटली.
मुंबई: पहिल्या टी 20 सामन्यात 50 धावांनी एकतर्फी विजय मिळवल्यानंतर टीम इंडियासमोर आता एजबॅस्टनच आव्हान आहे. हे तेच मैदान आहे, जिथे टीम इंडियाचा पाचव्या कसोटी सामन्यात पराभव झाला व कसोटी मालिका विजयाची संधी निसटली. आता याच मैदानात दोन्ही संघांमध्ये क्रिकेटच्या छोट्या फॉर्मेट मधील सामना होणार आहे, ऋषभ पंत, (Rishabh Pant) जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) आणि विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यामध्ये खेळणार आहेत. हे खेळाडू कोणाच्या जागेवर खेळणार? हा खरा प्रश्न आहे. जसप्रीत बुमराह अर्शदीप सिंहच्या जागी खेळेल. कारण अर्शदीपची फक्त एका टी 20 सामन्यासाठी संघात निवड झाली होती. पण पंत आणि विराट कोणाची जागा घेणार? हा खरा प्रश्न आहे. माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल यांनी ऋषभ पंत बद्दल एक विधान केलय. ऋषभ पंतला सलामीला पाठवता येईल, असं पार्थिवने म्हटलं आहे.
ऋषभला सलामीला पाठवण्याचा पर्याय
“ऋषभ पंतला आयपपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. पण एजबॅस्टन कसोटीच्या दोन्ही डावात शतक आणि अर्धशतक झळकावून त्याला त्याचा आत्मविश्वास परत मिळालाय. इशानच्या जागेवर त्याला ओपनिंगला पाठवता येईल. टॉप ऑर्डर मध्ये पंतला काही संधी मिळू शकतात” असं पार्थिव पटेल म्हणाला. वसीम जाफर पासून सुनील गावस्करांपर्यंत ऋषभ पंतला सलामीला पाठवण्याचा सल्ला दिला आहे. ऋषभ पंत सलामीला येणार असेल, तर इशान किशनला बाहेर बसावं लागू शकतं.
इशान किशनने किती धावा केल्या?
इशान किशनने आतापर्यंत 18 टी 20 सामन्यात 31.29 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 132 पेक्षा जास्त आहे. चार अर्धशतकं सुद्धा त्याने झळकावली आहेत. दुसरीकडे पंतचा टी 20 मध्ये रेकॉर्ड खूपच खराब आहे. पण तरीही ऋषभ पंतला संधी मिळू शकते. टीम मॅनेजमेंटने वेळोवेळी ऋषभ पंतवर विश्वास दाखवलाय.
आज टॉस नंतर कुठला संघ जाहीर होणार?
दुसऱ्याबाजूला विराट कोहली कोणाच्या जागेवर खेळणार? हा सुद्धा प्रश्न आहे. विराटच्या समावेशामुळे दीपक हुड्डाला बाहेर बसवाव लागेल. आयर्लंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 मध्ये त्याने शतक झळकावलं होतं. इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात चांगल्या धावा केल्या होत्या. त्यामुळे आज टॉस नंतर कुठला संघ जाहीर होतो, त्याकडे लक्ष आहे.