IND vs BAN: Rishabh Pant ने बांग्लेदशी बॅट्समनला चान्सच दिला नाही, पहा VIDEO
IND vs BAN: ऋषभ पंतची विकेटमागे चपळाई पाहून एमएस धोनीच आठवण झाली. एकदा लिंकवर क्लिक करुन VIDEO पहा
ढाका: भारताचा युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतकडून मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये अपेक्षित कामगिरी होत नाहीय. त्यामुळे तो टीकाकारांच्या रडारवर आहे. पण टेस्ट क्रिकेटमध्ये पंतने आपल्या कामगिरीने प्रभावित केलय. बांग्लादेश विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पंतला पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंगची संधी मिळाली. त्यावेळी त्याने नेहमीच्या शैलीमध्ये बॅटिंग केली व टीम इंडियावर दबाव कमी केला. पंतने शनिवारी चौथ्यादिवशी आपल्या अप्रतिम किपिंगचा नमुना पेश केला. त्याने अवघ्या काही क्षणात बांग्लादेशी फलंदाजाच स्टम्पिंग केलं.
टीम इंडियाने कसोटी जिंकली
टीम इंडियाने आज पाचव्यादिवशी हा कसोटी सामना 188 धावांनी जिंकला. टीम इंडियाने बांग्लादेशला विजयासाठी 513 धावांच लक्ष्य दिलं होतं. आज अखेरच्या दिवशी बांग्लादेशने कालच्या 6 बाद 272 धावसंख्येत 52 धावांची भर घातली. त्यांचा डाव 324 धावांवर आटोपला.
पंतची वेगवान किपिंग
बांग्लादेशने चौथ्या दिवशी नुरुल हसनच्या रुपात आपला सहावा विकेट गमावला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. हा विकेट घेण्यात अक्षर इतकच ऋषभच योगदान आहे. त्याने नुरुल हसनच स्टम्पिंग केलं. 88 व्या ओव्हरचा शेवटचा चेंडू पटेलने टाकला. ऑफ स्टम्पवर पडून चेंडू बाहेरच्या बाजूला गेला. हसन या बॉलवर बीट झाला.
धोनीची आठवण झाली
पंतने चेंडू पकडून विद्युतवेगाने स्टम्पिंग केलं. टीम इंडियाने अपील केलं. लेग अंपायरने तिसऱ्या पंचांकडे पाठवलं. पंतने स्टम्पिग केलं, तेव्हा हसनचे पाय क्रीजबाहेर होते. तिसऱ्या अंपायरने हसनला आऊट दिलं. हसनने फक्त तीन धावा केल्या. पंतची ही किपिंग पाहून महेंद्रसिंह धोनीची आठवण झाली. धोनी अशा प्रकार विकेटच्या मागे स्टम्पिंग करण्यात माहीर होता.
Incredible stumping from Pant. pic.twitter.com/iwbXcNCtrc
— Johns. (@CricCrazyJohns) December 17, 2022
कसोटीमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड कायम
चटोग्राम कसोटी जिंकून टीम इंडियाने बांग्लादेश विरुद्ध कसोटी फॉर्मेटमध्ये आपलं विजयी अभियान कायम ठेवलय. बांग्लादेशने अजूनपर्यंत कसोटीमध्ये भारतावर विजय मिळवलेला नाही. दोन्ही देशांमध्ये 12 कसोटी सामने खेळलेत. यात भारताने 10 सामने जिंकलेत. 2 कसोटी सामने ड्रॉ झालेत.