Rishabh Pant IPL DC Team: ऋषभ दीर्घकाळ क्रिकेटच्या मैदानापासून लांब राहणार, तर मग दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन कोण?

Rishabh Pant IPL DC Team: अपघातामुळे ऋषभ पंतला दीर्घकाळ क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहावं लागू शकतं. अशावेळी कॅप्टनशिपसाठी 'या' खेळाडूंची नाव चर्चेत आहेत.

Rishabh Pant IPL DC Team: ऋषभ दीर्घकाळ क्रिकेटच्या मैदानापासून लांब राहणार, तर मग दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन कोण?
Rishabh-PantImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 11:29 AM

Rishabh Pant IPL DC Team: स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतच्या अपघातानंतर भारतीय टीमप्रमाणेच आयपीएल फ्रेंचायजी दिल्ली कॅपिटल्सही टेन्शनमध्ये आहे. ऋषभ दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन आहे. त्याला बर व्हायला 5 ते 6 किंवा 9 महिन्यापर्यंत वेळ लागू शकतो. त्यामुळे दिल्ली फ्रेंचायजीची चिंता वाढली आहे. आयपीएलचा पुढचा 2023 चा सीजन एप्रिलमध्ये सुरु होणार आहे. दिल्ली कॅपिटल्ससमोर ऋषभ पंतच्या जागी नवा कर्णधार निवडण्याच आव्हान आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या कॅप्टनशिपसाठी ऑस्ट्रेलियाई ओपनर डेविड वॉर्नर आणि भारतीय बॅट्समन पृथ्वी शॉ हे दोन मोठे दावेदार आहेत.

कॅप्टनशिपसाठी चार खेळाडूंची नाव चर्चेत

त्याशिवाय ऑस्ट्रेलियाई ऑलराऊंडर मिचेल मार्श आणि मनिष पांडे सुद्धा शर्यतीत आहेत. सर्वप्रथम ऋषभ पंत कधीपर्यंत बरा होईल, हे काही दिवसातच समजेल. त्यानंतर ऋषभ आयपीएलपर्यंत फिट झाला नाही, तरी वरील चार खेळाडूंपैकी एकाला नेतृत्वाची संधी मिळेल.

ऋषभच्या जागी तो कॅप्टन झाल्यास आश्चर्य नाही

डेविड वॉर्नरकडे आयपीएलमध्ये कॅप्टनशिप करण्याचा अनुभव आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सनरायजर्स हैदराबादने 2016 साली आयपीएलच जेतेपद पटकावलं होतं. पंतच्या जागी वॉर्नर कॅप्टन झाल्यास, आश्चर्य वाटणार नाही. वॉर्नरने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट मॅचमध्ये डबल सेंच्युरी झळकवली आहे.

पृथ्वी शॉ सुद्धा दावेदार

पृथ्वी शॉ सुद्धा कर्णधारपदासाठी दावेदार आहे. त्याच्याकडे कॅप्टनशिपचा अनुभव आहे. त्याच्या नेतृत्वाखाली 2018 साली टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला आहे. 23 वर्षाच्या पृथ्वीने मुंबई टीमच नेतृत्व केलय. दिल्ली कॅपिटल्स या युवा खेळाडूला संधी देऊ शकते. अशी आहे दिल्ली कॅपिटल्सची सध्याची टीम

ऋषभ पंत (कॅप्टन), डेविड वॉर्नर, मुकेश कुमार, रिली रोसो, मनीष पांडे, पृथ्वी शॉ, फिल सॉल्ट, रिपल पटेल, रोव्हमॅन पॉवेल, सरफराज खान, यश ढुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिच नॉर्खिया, चेतन सकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, इशांत शर्मा, प्रवीण दुबे आणि विक्की ओस्तवाल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.